राज्यातील 265 तालुक्यामध्ये दृष्काळ जाहीर * बुलडाण्यातील 13 तालुक्यांचा समावेश * शेतकरी हिताच्या निर्णय बद्दल केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मानले राज्य सरकारचे आभार

राज्यातील 265 तालुक्यामध्ये दृष्काळ जाहीर 
* बुलडाण्यातील 13 तालुक्यांचा समावेश 
* शेतकरी हिताच्या निर्णय बद्दल केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मानले राज्य सरकारचे  आभार 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        पावसाचा खंड पडल्यामुळे राज्यातील 265 तालुके राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुके म्हणून जाहीर केले आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यामधे बुलढाणा जिल्ह्यातील  13 ही तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे . राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,  उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांचे आभार व्यक्त केले आहे.
         महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे ही पिके कोमजून गेली होती तर अनेक ठिकाणी ही पिके वाळुन गेली आहेत,  त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. दुष्काळी भागाचा दौरा केल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती,  त्यानंतर राज्यातील 265 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहे. या संदर्भातील शासन निर्णय 25 सप्टेंबरला निर्गमित झाला आहे. या 265 तालुक्यांना दुष्काळी सवलतीचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दुष्काळग्रस्त यादीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 13 ही तालुक्यांचा समावेश करण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री,  उपमुख्यमंत्री यांचे केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आभार व्यक्त केले.