पत्रकार विलास खंडेराव पालकमंत्री यांच्याहस्ते सन्मानित

पत्रकार विलास खंडेराव पालकमंत्री यांच्याहस्ते सन्मानित 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      बुलढाणा येथील पत्रकार तथा संपादक आर.टी.आय. प्रचारचे मुख्य संपादक विलास खंडेराव यांना  स्वतंत्रदिनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी 101 प्रसंगी रक्तदान शिबीरामध्ये सहभाग देऊन रक्तदानाचे मोलाचे कार्य  केल्याबद्दल बुलढाणा जिल्हा पालकमंत्री मकरंद आबा पाटील व जिल्हाधिकारी देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 15 ऑगस्ट 2026 स्वातंत्रदिनी कार्यक्रमामध्ये त्यांचा मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

         विलास खंडेराव हे गेल्या अनेक वर्षापासून वेग-वेगळ्या वृत्तपत्रामध्ये कार्यरत असून ते आर.टी.आय. प्रचार या वृत्तपत्राचे मुख्य संपादक आहेत. त्यांनी आपल्या लेखनीतून अनेक गोर-गरीब, कष्टकरी जनतेला न्याय देण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने ते करीत आहेत. हया कार्यबरोबरच बुलढाणा जिल्हयातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते व साहित्यीक म्हणून त्यांची फार मोठी ओळख आहे. ऐवढेच नव्हे तर गेली अनेक वर्षे त्यांनी अध्यापन क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ कार्य त्यांच्या हातून झालेले आहे. ते बुलढाणा जिल्हयातील नांदुरा तालुक्यातील नारखेड येथील मुळचे रहिवासी असून त्यांचे बालपन ग्रामिण भागामधूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या समाजिक कार्याला तेथूनच सुरुवात त्यांनी केलेली आहे. विशेष म्हणजे आजतागायत बुलढाणा जिल्हयात 101 वेळेस रक्तदान देणारे पत्रकार म्हणून विलास खंडेराव यांचे नांव अग्रेसर आहे.

        बालपनापासून वाचन कौशल्य व मैत्री व एकमेकांबद्दलचा जिव्हाळा जोपासणे हा त्यांचा छंद आहे. हया कार्यामुळेच आज बुलढाणा जिल्हयातच नव्हे तर राज्यामध्ये त्यांचे नांव पत्रकारीतेच्या माध्यमातून व सामाजिक कार्याच्या माध्यमातून दिवसें-दिवस लोकांमध्ये एक नवी अभिरुची निर्माण करणारी त्यांचे कार्य अनमोल असे आहे. समाजामध्ये जिवन जगत असतांना आपण इतरांसाठी देखील मदतीचा हात पुढे केला पाहीजे म्हणून त्यांनी 101 वेळेस आपली स्वतःची परवाह न करता इतरांच्या सुख-दुःखांमध्ये धावून गेलो पाहिजे म्हणून त्यांनी रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठ दान आहे हे ब्रिद वाक्य घेऊन आपल्या कार्यात ते सदैव मग्न असतात ऐवढे मात्र निश्चित.