बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
नैसर्गिक मध उत्पादन क्षेत्रात कार्यरत युवा उद्योजक मंगेश काटे यांनी व्यवसायाची माहिती देण्यासाठी अभिता कंपनीच्या खारघर येथील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी त्यांचा सत्कार केला.
मुंबई येथे गेल्या ७ वर्षांपासून मास्टर बीकीपर म्हणून कार्यरत असलेले मंगेश काटे हे मधमाशीपालन उद्योजक आहेत. नैसर्गिक मध उत्पादन क्षेत्रात ते कार्यरत आहेत. उत्तर भारतातील घनदाट जंगलांमध्ये Apis Mellifera मधमाशांच्या सुमारे १,२०० वसाहतींचे व्यवस्थापन ते करतात. कोणतीही प्रक्रिया न केलेला RAW व शुद्ध नैसर्गिक मध तयार करतात. जांभूळ, तुळस, लिची, जंगलातील मध यांसह Monoflora व Multiflora Honey त्यांच्या विशेषतेचा भाग आहे. मधमाशीपालन, नैसर्गिक मध उत्पादन व या क्षेत्रातील विविध संधींबाबत सुनील शेळके यांनी माहिती जाणून घेतली. तसेच पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
