बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड बुलडाणा, व वसंतप्रभा कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी बुलडाणा, यांचे संयुक्त विद्यमाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी नशनल हायस्कूल खामगाव येथे श्री संत गजानन महाराज पालखी आगमना निमित्त आषाढी वारीत सर्व वारकरी बंधू-भगिनींना संस्थे तर्फे मोफत नेत्र तपासणी व फिजिओथेरपीची सेवा देण्यात आली. या शिबिरामध्ये शंभर ते सव्वाशे वारकरी बंधू-भगिनींनी फिजिओथेरपीचा लाभ घेतला. सोबतच 90 ते 100 बंधू भगिनींनीची नेत्र तपासणी करण्यात आली असून ३० जणांना डोळ्याचे चष्म्याचे नंबर काढून देण्यात आले. या शिबिरामध्ये रुग्णांना औषधोपचार करण्यात आले. यावेळी शिबिरामध्ये संस्थेचे उपाध्यक्ष रामकृष्ण म्हस्के व डॉ.शोन चिंचोले संस्थेचे कर्मचारी राजेश वैष्णव, शाकीर अन्सारी नेत्र चिकित्सक, तसेच वसंतप्रभा कॉलेज ऑफ फिजिओथेरेपीचे विद्यार्थी, कर्मचारी, वारकरी बंधू भगिनींची सेवा करण्यास उपस्थित होते. मानस फाउंडेशन तथा शिवसाई पत संस्थेचे अध्यक्ष डी.एस.लहाने सर यांचे तर्फे खामगाव येथे जाणे-येणे करिता वाहनाची सोय करण्यात आली होती. या शिबिराला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी अथक परिश्रम घेतले. वारकरी बंधू-भगिनींचाही चांगला प्रतिसाद मिळाला.
