ईद मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने रुग्णांमध्ये फळांचे वाटप !

ईद मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने रुग्णांमध्ये फळांचे वाटप !
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       ईद मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने, हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त २८ ऑगस्ट रोजी शुक्रवारी अल मदिना एज्युकेशन फाउंडेशनतर्फे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटण्यात आली.
      हज़रत मोहम्मद पैगंबर साहेबांनी संपूर्ण जगाला मानवता, शांती, प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश दिला आहे. सर्व धर्मांच्या आणि जातींच्या लोकांनी बंधुभावाने एकत्र राहावे आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे, हे मुस्लिम समाजाचे ध्येय आहे. पैगंबर साहेब यांच्या जयंती निमित्त, बंधुभावाचे उदाहरण सादर करत रुग्णांना फळे वाटून  त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी अल्लाहकडे प्रार्थना केली. 
        यावेळी अल मदीना एजुकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख, जामा मस्जिदचे अध्यक्ष इलियास कच्ची, ईमान तंजीमचे हसन इनामदार, वसीम खान, सलमान खान, शेख साजिद,  इमाद काजी, अब्दुल रहमान, अब्दुल खालिद, फरदिन शेख, आसिफ हुसैन, फरहान खान, नाजिम खान, सैयद इस्माईल, शाहरुख शेख, शेख मुज्जु, अतहर अहमद, डॉ.अरशद, शेख शारीम आदि पदाधिकारी उपस्थित होते.