सर्वोच्च गुणवत्ता अन शेतकरी हिताला प्राधान्य - सुनील शेळके* अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजच्या खरीप हंगामाचा आढावा

सर्वोच्च गुणवत्ता अन शेतकरी हिताला प्राधान्य - सुनील शेळके
* अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजच्या खरीप हंगामाचा आढावा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        शेतकरी प्रथम, सर्वोच्च गुणवत्ता आणि कृषी नवकल्पनांचा सातत्यपूर्ण ध्यास या भूमिकेसह अभिता ॲग्रो इंडस्ट्रीज आगामी कृषी हंगामांसाठी नव्या जोमाने सज्ज असल्याचा विश्वास कंपनीचे संस्थापक तथा सीईओ सुनील शेळके यांनी व्यक्त केला.

       अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजच्या महाराष्ट्र मार्केटिंग टीम आणि उत्पादन विभागाची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीत खरीप हंगामातील कामगिरीचा सविस्तर आढावा घेत पुढील कृषी हंगामासाठीची दिशा निश्चित करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात टीमने आव्हानात्मक परिस्थितीत दाखवलेले कष्ट, समर्पण, सातत्य आणि जिद्द निश्चितच अभिमानास्पद असल्याचे शेळके यांनी सांगितले. यंदाचा खरीप हंगाम सोयाबीन पिकासाठी अनेक आव्हानांनी भरलेला असतानाही अभिता-३३३ या संशोधित वाणाने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. याशिवाय लवकरच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अभिता ॲग्रीकल्चरल ड्रोन सर्व्हिस सुरु होत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.