बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळ कार्यकारिणी जाहीर* बुलडाणा अर्बन गणेश मंडळाचे कार्यकारणीवर प्रशांत काळवाघे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी अजय विजय पाटील निवड

बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळ कार्यकारिणी जाहीर
* बुलडाणा अर्बन गणेश मंडळाचे कार्यकारणीवर प्रशांत काळवाघे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी अजय विजय पाटील निवड
बुलडाणा : (एशिया मंच न्यूज )
      दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बुलडाणा अर्बन परीवाराकडून बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस झालेला असुन त्यामुळे नवचैतन्याची लहर मार्केटमध्ये दिसत आहे. मंडळाच्या वतीने यावर्षी दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे वतीने दरवर्षी गणेश उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
      बुलडाणा अर्बन मंडळाचे यावर्षी २५ वे असून यावर्षी १४ सप्टेंबर २०२६ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेश उत्सावानिमित संस्थेने गणेश उत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी, बुलडाणा अर्बन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर आणि बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा सौ. कोमलताई सुकेश झंवर आणि अनंताभाऊ देशपांडे, संस्थेचे सरव्यवस्थापक कैलास बन्सीलाल कासट यांच्या मार्गदर्शना खाली निवड करण्यात आली.


* गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर

        अध्यक्ष प्रशांत श्रीराम काळवाघे, तर उपाध्यक्षपदी अजय विजय पाटील तर सचिवपदी विलास नारायण देवकर, सहसचिव अजय पारसमल तातेड, कोषाध्यक्ष, निलेश सुरेशराव बनसोडकर,तर सदस्य सर्वश्री रविंद्र प्रभाकर कुळकर्णी, राहुल विठ्ठलराव डहाळे, दिनेश भास्कर राजपूत, संजय अंबादास पाठक, मंगेश प्रकाश बनसोड, संतोष नामदेव सोळंके, विनोद विष्णू कोलते, अनिल वासुदेव महाले, किशोर रामदास सावळे, अजय विजय कऱ्हाळे, सुनील गुलाबराव जाधव, कैलास तुळशीराम चव्हाण, श्रीकांत सखाराम भराड, संदीप मुकेश काळे, महेश श्री किसन गायगोळ, राकेश दिलीप मुळे, प्रशांत देवदास घुसळकर, सौ. वर्षा अजितसिंग राजपूत, सौ. अनुराधा शैलेश कुळकर्णी, सौ कल्पना रविंद्र जाधव,बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचा लाभ शहर व परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रशांत श्रीराम काळवाघे, सचिव विलास नारायण देवकर व गणेशोत्सव मंडळ कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

* गणेशोत्सव मंडळाचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे...
        संस्थेच्या मुख्य कार्यालयात शुक्रवार ९ सप्टेंबर २०२६ रोजी श्रींचे मंडप पूजन, तर संस्थेच्या मुख्य कार्यालयात सोमवार,  १४ सप्टेंबर २०२६ रोजी मुर्ती स्थापना. गोवर्धन इमारती मधील हॉल येथे मंगळवार,  १५ सप्टेंबर अथर्वशीर्ष पठण. बुधवार, १६ सप्टेंबर २६ रोजी दुपारी ३ वाजता गोवर्धन इमारती मधील हॉल येथे पुरुष कर्मचाऱ्यांसाठी एक मिनिट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा बुधवार दि १६ सप्टेंबर २०२६ ठेवण्यात आली आहे, या स्पर्धेचा विषय रामायण, महाभारत व धार्मिक यावर आधारित आहे. गुरुवार १७ सप्टेंबर २०२६ सायं ७ वा. गोवर्धन इमारतीमधील हॉलमध्ये सुरसंगम या सदाबहार गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाचे मार्गदर्शक अनंताभाऊ देशपांडे हे असणार आहे. शनिवार १९ सप्टेंबर २०२६ गौरी सजावट हि स्पर्धा पर्यावरण पूरक असणार आहे , हि स्पर्धा अनंताभाऊ देशपांडे यांच्या मार्गदर्शना खाली पार पडणार आहे. बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाने या वर्षी बुलडाणा शहरातील रिल्स कलाकारांसाठी बुलडाणा व्हायरल मिमिक्री रिल्स या स्पर्धेचे रविवार  २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वा गोवर्धन इमारतीमधील हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. अनंताभाऊ देशपांडे यांच्या मार्गदर्शना खाली गोवर्धन इमारतीमधील हॉलमध्ये २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता खास महिला कर्मचाऱ्यांसाठी एक मिनिट या स्पर्धेचे आयोजन केले आहे, तर सोमवार २१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वा. सहकार विद्या मंदिर, चिखली रोड, बुलडाणा च्या सांस्कृतिक भवन येथे भ्रमाचा भोपळा या तिन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही खास आकर्षण असलेला कर्मचारी लाईव्ह ऑर्केस्ट्रा २३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वा. गोवर्धन इमारतीमधील हॉलमध्ये ठेवण्यात आला आहे. कर्मचारी गणेशोत्सव मंडळाने यावर्षी फक्त कर्मचाऱ्यांसाठी कपल आयडॉल स्पर्धा २४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वा. गोवर्धन इमारतीमधील हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. कर्मचारी गणेशोत्सव मंडळाने सत्यनारायण पूजा गुरुवार २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता ठेवण्यात आले आहे. शुक्रवार २५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता श्री चे विसर्जन मिरवणूक सर्वांसाठी असणार आहे. बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विविध स्पर्धांच्या विजेत्यांना सोमवार २८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला आहे.तरी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा आस्वाद बुलडाणा शहरातील गणेश भक्तांनी घ्यावा असे आवाहन गणेशोत्सव मंडळ कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले.