दे. राजा : (एशिया मंच न्यूज )
विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जपणूक व्हावी, निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष ओळख व्हावी, नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव, निर्णयक्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने गुरुवार bbbb२७ ऑगस्ट २०२६ रोजी दीनदयाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळाची निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी लोकशाही पद्धतीने मतदानाचा हक्क बजावत आपल्या प्रतिनिधींची निवड केली. नवनिर्वाचित विद्यार्थी विकास मंडळामध्ये मुख्यमंत्रीपदी धनश्री शुद्धोधन कदम, उपमुख्यमंत्रीपदी प्रांजल विठ्ठल नागरे, क्रीडा मंत्रीपदी शिवप्रसाद गणेश झोरे, अर्थमंत्रीपदी पूजा अरुण जायभाये, शिक्षणमंत्रीपदी स्नेहल श्रीकृष्ण जायभाये, सांस्कृतिक मंत्रीपदी पायल पंढरीनाथ नागरे, पर्यावरण मंत्रीपदी राहुल गजानन भानुसे तसेच सांखिखी मंत्रीपदी आरती दिलीप म्हस्के यांची निवड झाली.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अमोल काकड, क्षेत्रीय अधिकारी संतोष खुळे, मतदान अधिकारी सिद्धेश्वर सरोदे यांनी कामकाज पाहिले.
नवनिर्वाचित विद्यार्थी विकास मंडळाचे प्राचार्य भगवान आरसोडे व पर्यवेक्षक राजेश भिवटे, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना लोकशाहीची मूल्ये प्रत्यक्ष अनुभवातून समजावून देणारी आणि नेतृत्वगुणांना चालना देणारी ही निवडणूक विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरली.
