ईद मिलादुन्नबीनिमित्त आयोजित भक्तिगिताने ( मुशायरा) प्रेक्षक मंत्रमुग्ध

ईद मिलादुन्नबीनिमित्त आयोजित भक्तिगिताने ( मुशायरा) प्रेक्षक मंत्रमुग्ध 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
    ईद मिलादुन्नबी निमित्त २० ऑगस्ट रोजी स्थानिक इकबाल चौक जामा मस्जिदच्या समोर नातिया मुशायरा अर्थात भक्तिगित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कवींच्या सुमधुर आवाजाने आणि पैगंबर साहेब यांच्या जीवनावर आधारित भक्तीगीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.
          हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या १५०१ व्या जयंती निमित्त, सलग चौथ्या वर्षी अल मदिना फाउंडेशन, मिलाद कमेटी बुलढाणा शहरच्या वतीने गुरुवार 20 ऑगस्ट रोजी रात्री ८ ते १० या वेळेत इकबाल चौक परिसरात नातिया मुशायरा म्हणजेच भक्तीगीताचा कार्यक्रम
आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उर्दू कवी, सर्जन डॉ. गणेश गायकवाड हे होते तर संचालन कवी मुस्तकीम अर्शद यांनी केले होते. याशिवाय रियाज अन्वर बुलढानवी, आबिद नजर, करीम दुर्वेश, उमर बुलढ़ाणवी, समीर बुलढ़ाणवी, आसिफ मुनव्वर, अजीम रायपुरी आदि कवींनी आपली उत्कृष्ट कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.
        नातिया मुशायरा यशस्वीतेसाठी शिक्षक रईस काज़ी, इमाद काजी आणि रियाज अन्वर यांनी विशेष परिश्रम घेतले.