* रविंद्र वाघ पत्रकार, यांची ‘फुले-शाहू-आंबेडकर’ पुरस्कारासाठी निवड
मेहकर : (एशिया मंच न्यूज )
फुले, शाहू, आंबेडकरी विचारांना वाहून घेतलेल्या बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या वतीने सामाजिक अभिसरण व प्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू आहे. समाजातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैचारिक, कला, शौर्य, उद्योग तसेच समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी या संमेलनाच्या माध्यमातून सन्मान करण्यात येतो.
यंदा २३ ऑगस्ट २०२६ रोजी संत नगरी पंढरपूर येथे पद्मनाभ पॅलेस हॉल, मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सातव्या राज्यस्तरीय बहुजन साहित्य संमेलन २०२६ मध्ये प्रदान करण्यात येणाऱ्या समाजसेवा क्षेत्रातील ‘फुले-शाहू-आंबेडकर’ पुरस्कारासाठी मेहकर येथील आयु. रविंद्र वाघ यांची निवड करण्यात आली आहे.
समाजसेवा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या वतीने रविंद्र वाघ यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संमेलनात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. या पुरस्कारामुळे मेहकर परिसरातील त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव होणार असून, विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
