पत्रकार छोटू कांबळे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ जाहीर

पत्रकार छोटू कांबळे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ जाहीर
* निर्भीड, लोकाभिमुख पत्रकारितेची राज्यस्तरावर दखल 
चिखली : (एशिया मंच न्यूज )
          पत्रकारिता क्षेत्रात सामाजिक बांधिलकी, निर्भीडपणा आणि लोकहिताची भूमिका सातत्याने जपणारे ‘दैनिक आम्ही चिखलीकर’चे मुख्य संपादक तथा युवा पत्रकार छोटू सुधाकर कांबळे यांची ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा राज्यस्तरीय सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

       साखरखेर्डा ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथे दिवंगत वृक्षमित्र मधुकरराव खंडारे यांच्या तिसऱ्या स्मृतिप्रित्यर्थ विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६ आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी युवा पत्रकार छोटू कांबळे यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. निवड समितीने प्रस्तावावर सखोल चर्चा करून त्यांच्या पत्रकारितेतील कार्याची दखल घेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ देण्याचा निर्णय घेतला.

       छोटू कांबळे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य नागरिक, कष्टकरी, शेतकरी, शोषित, वंचित आणि पीडित घटकांच्या प्रश्नांना सातत्याने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अन्यायाविरोधात आवाज उठविणे, प्रशासनाच्या कामकाजावर लोकहिताच्या दृष्टीने प्रश्न उपस्थित करणे, सामान्यांच्या समस्या निर्भीडपणे मांडणे आणि सामाजिक प्रश्नांना व्यापक प्रसिद्धी देणे, ही त्यांच्या पत्रकारितेची प्रमुख वैशिष्ट्ये राहिली आहेत.
      दरम्यान, छोटू कांबळे यांच्या निवडीची माहिती समोर येताच पत्रकारिता, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार बांधव, मित्रपरिवार तसेच शुभचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुरस्काराचे मुख्य आयोजक  सचिन खंडारे, निवड समितीचे अध्यक्ष  विकास सुखधाने, उपाध्यक्ष  समाधान सरकटे यांच्यासह निवड समितीने छोटू कांबळे यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.