स्वातंत्र्यलढा ते लोकशाही; पत्रकारांचे योगदान अमूल्य! : राजेश डीडोळकर * पत्रकार भवन येथे ध्वजारोहण उत्साहात

स्वातंत्र्यलढा ते लोकशाही; पत्रकारांचे योगदान अमूल्य! :  राजेश डीडोळकर  *  पत्रकार भवन येथे ध्वजारोहण उत्साहात 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         स्वातंत्र्यपूर्व काळात थोर क्रांतिकारी महापुरुषांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनतेमध्ये स्वातंत्र्याची ज्वाला पेटवली. पत्रकारांच्या याच लेखणीने परकीय सत्तेविरुद्ध जनजागृती करत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात ऐतिहासिक योगदान दिले.
        आज काळ बदलला असला तरी पत्रकारांचे कर्तव्य बदललेले नाही. आजही समाजातील शोषित, पीडित आणि वंचितांचा आवाज बनून पत्रकार लेखणी झिजवत आहेत. जनतेला न्याय मिळवून देणे हीच खरी पत्रकारिता आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार तथा बुलढाणा जिल्हा पत्रकार संघांतर्गत पत्रकार हल्ला कृती समितीचे अध्यक्ष राजेश डिडोळकर यांनी आपले विचार मांडले.                       स्वातंत्र्यदिना निमित्त बुलढाणा येथे पत्रकारांच्या हक्काच्या पत्रकार भवन इमारतीवरील ध्वजारोहण त्यांच्याहस्ते करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. 

    पत्रकारांच्या हक्काचा ध्वजवंदन कार्यक्रम पत्रकार भवन बुलढाणा येथे दरवर्षीप्रमाणे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत होते. राजेश डीडोळकर यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीत, ‘वंदे मातरम’ गीत आणि महाराष्ट्र गीताने पत्रकारांमध्ये देशप्रेमाची ऊर्जा संचारल्याचे पाहायला मिळाले. यानंतर, पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी सांगितले की, पत्रकारांच्या हक्काचा ध्वजवंदन कार्यक्रम ही सर्व पत्रकारांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ज्येष्ठ पत्रकारांच्याहस्ते ध्वजारोहण व्हावे, ही सुरुवातीपासूनची आपली संस्कृती असून, पत्रकारितेत प्रदीर्घ सेवा दिलेल्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचे ते माध्यम आहे. पत्रकारांची एकजूट राष्ट्रीय एकात्मतेसाठी अत्यंत गरजेची असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर, राजेश डिडोळकर यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारितेवर प्रकाश टाकत आजही पत्रकारितेचे कर्तव्य अत्यंत महत्त्वाचे आहे, असे पटवून दिले. याप्रसंगी चंद्रकांत बर्दे, नितीन शिरसाठ, मृणाल सावळे, सुरेखा सावळे, सुभाष लहाने, प्रेमकुमार राठोड, भानुदास लकडे, गणेश निकम, कासिम शेख, दीपक मोरे, वसीम शेख, गजानन धांडे, संदीप वानखेडे, शिवाजी मामनकर, अभिषेक वरपे, नितीन कानडजे, सुनील मोरे, अजय राजगुरे, विलास खंडेराव, प्रशांत सपकाळ, शौकत शाह, गजानन आखाडे, रहेमत अली शाह, अजय काकडे, आकाश भालेराव, आकाश गायकवाड, तुषार यंगड यांसह अनेकांची उपस्थिती होती.