* नोंदणी केलेले फॉर्म रद्द केल्याचा प्रा. लहाने यांचा आरोप
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापकांवर भीक नको पण कुत्र्आवर असे म्हणण्याची वेळ शासनाने आणली आहे. मुख्याध्यापकांना बोलावून त्यांना विविध प्रकारे दबाव टाकून त्यांच्याकडून नोंदणीसाठी भरलेले फॉर्म रद्द केले जात आहे. प्रशासनाच्या वतीने मुख्याध्यापकांना गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देखील दिल्या गेल्या. अनेक मुख्याध्यापकांनी
नोंदणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नियमात बसत
असून सुद्धा शेकडो शिक्षक मतदाना पासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असा घणाघाती आरोप शिवसेना नेते प्रा. डी. एस. लहाने यांनी केला आहे.
याबाबत त्यांनी विभागीय आयुक्तांना नुकतेच पत्र देखील दिले. शिक्षक मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी विभागात कार्यरत शिक्षकांनी मतदान करणे अपेक्षित आहे. मात्र शासनाने गुंतागुंत निर्माण करण्याचा डाव टाकला. अमरावती विभाग शिक्षक मतदार संघात इंग्रजी माध्यमाच्या सेल्फ फायनान्स शाळेतील
शिक्षकांची नोंदणी करताना प्रशासनाच्या वतीने अनेक अडचणी निर्माण केल्या गेल्या आहे. काही
लोकांच्या नियमबाह्य तक्रारींची दखल घेत प्रशासनाने मुख्याध्यापकांना बोलावून दबाव टाकून त्यांच्याकडून नोंदणीसाठी भरलेले फॉर्म रद्द केले. प्रशासनाच्या वतीने
मुख्याध्यापकांना गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या गेल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक मुख्याध्यापकांनी भीक नको, कुत्रे आवर या म्हणी प्रमाणे नोंदणी न करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे नियमात बसत असून सुद्धा शेकडो शिक्षक मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निर्वाचन आयोगाच्या पत्रानुसार प्रत्येक माध्यमिक शाळेचा दर्जा असलेल्या (म्हणजे 1 ते
10 वर्ग असणारे, 5 ते 10 वर्ग असणारे व 8 ते 10 वर्ग असणाऱ्या) शाळेतील वर्ग 1 ते 10 ला
शिकवणारे व नोव्हेंबर 2025 पर्यंत 3 वर्षे शैक्षणिक अनुभव असणारे सर्व शिक्षक पात्र आहेत. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या सेल्फ फायनान्स शाळेतील सर्व शिक्षकांनी नोंदणी करून घेण्यासंदर्भात प्रा.डी.एस. लहाने यांनी विभागीय आयुक्त तथा विभागीय निर्वाचन अधिकारी यांना निवेदन दिले
असून नोंदणी न झालेल्या शिक्षकांनी तात्काळ फॉर्म भरून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन प्रा.डी.
एस. लहाने यांनी केले आहे.
