एस.टी. स्थानकाच्या २०० मीटर परिसरात खाजगी वाहने लावल्यास थेट 'जप्ती' 
* पोलीस-आरटीओची संयुक्त कारवाई !
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        एस.टी. बस स्थानक परिसरात प्रवाशांची अवैध वाहतूक करणाऱ्या आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या खाजगी वाहनधारकांना आता प्रशासनाने थेट 'रेड सिग्नल' दाखवला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. प्रियंका नारनौरे यांच्या आदेशानंतर बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक, आरटीओ प्रशासनाने संयुक्तपणे जिल्ह्यात 'ऑपरेशन क्लीन' सुरू केले असून, यामुळे खाजगी माफियांचे धाबे दणाणले आहेत.
          गेल्या महिन्यात 5 ते 15 जून दरम्यान राबविलेल्या मोहिमेत 306  वाहनांवर कारवाई करून 4 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. या कारवाईचा थेट परिणाम म्हणून बुलढाणा एस.टी.च्या उत्पन्नात 74  लाख रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. आता 1 ते 10 जुलै दरम्यान या मोहिमेचा दुसरा टप्पा अधिक आक्रमक करण्यात आला असून, अवघ्या काही दिवसांत 270 वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे व त्यांच्याकडून  27, 2900  रुपयांचा दंड वसूल केला आहे. बस स्थानकाच्या 200 मीटर परिसरात गाडी उभी करून प्रवाशांची चढ-उतार केल्यास आता केवळ दंड नाही, तर थेट वाहन जप्त केले जाईल, असा कडक इशारा पोलीस आणि आरटीओ प्रशासनाने दिला आहे.