राजर्षी शाहू मल्टिस्टेटचा ४ जुलैला संभाजीनगरात ग्राहक मेळावा

राजर्षी शाहू मल्टिस्टेटचा ४ जुलैला संभाजीनगरात ग्राहक मेळावा

छत्रपती संभाजीनगर : (एशिया मंच न्यूज )
              राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या छत्रपती संभाजीनगर शाखेचा ग्राहक मेळावा उद्या ४ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हाय कोर्टजवळील इंडियाना व्हेज रेस्टॉरंटमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

           अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके राहणार आहेत. यावेळी संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके, उद्योजक डॉ.डी. एस. काटे, दौलताबादचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र घायवट, महापालिकेचे उपायुक्त अंकुश पांढरे, उमंग मॅटरनिटी आणि आयव्हीएफ सेंटरच्या डॉ.अश्विनी देशमुख, गायक व संगीतकार प्रा. राजेश सरकटे, स्टेट बँक मंडळस्थित अधिकारी अर्जुन डोंगरे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ऍड. ज्ञानेश्वर बागुल, ख्याती सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष मृणालिनीताई बागुल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ग्राहक मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन सरव्यवस्थापक दिलीप चव्हाण, विभागीय व्यवस्थापक चेतन गवते, सह विभागीय व्यवस्थापक मीनाक्षी साळुंके, शाखा व्यवस्थापक कल्याणी पडघान, राजू खडके यांनी केले आहे.