बुलढाण्यात आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त विधवा महिलांचे चर्चासत्र
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
संपूर्ण जगात 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिनाचे औचित्य साधून मानस फाउंडेशन बुलढाणा यांच्यातर्फे विधवा महिला चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मानस फाउंडेशनचे अध्यक्ष डी.एस. लहाने सर, मानस फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी भगिनी शहीना ताई पठाण, सुरेखा सावळे, प्रज्ञा लांजेवार, प्रतिभा भुतेकर, अनिता कापरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. या चर्चासत्रासाठी जिल्हाभरातून अनेक विधवा महिला भगिनी उपस्थित होत्या. या चर्चासत्रात विधवा महिलांच्या आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणी त्यासाठी शासनाने काय दखल घ्यावी, अशा अनेक गोष्टींचा उलघडा समोर आला.
गेल्या दहा वर्षापासून मानस फाउंडेशन विधवा महिलांसाठी महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण देशात कार्य करत आहे. मानस फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत 150 पेक्षा जास्त विधवा महिलांचा पुनर्विवाह मानस फाउंडेशनच्या माध्यमातून संपन्न झाले. त्या चर्चासत्रात विधवा महिलांच्या आयुष्यातील समस्या व त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे, अशा अनेक गोष्टींचा उलगडा त्या ठिकाणी सामोर आला. विधवा महिलांच्या आयुष्यात किती संघर्ष असतो किती अडीअडचणी असतात त्यादेखील चर्चासत्रांच्या माध्यमातून समोर आल्या. या चर्चासत्रात विधवा महिलांच्या अडीअडचणी आहेत.
* एकल महिलांचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य : डी. एस. लहाने
विधवा म्हणून हिनावल्यास शिक्षा व्हावी, त्या प्रशासनासमोर मांडण्याचे आवाहन मानस फाउंडेशनचे अध्यक्ष डी. एस. लहाने सर यांनी सर्व विधवा महिला भगिनींना दिले आहे.
