.फुले जन्मशताब्दी वर्ष व राजर्षी शाहू म.जयंती निमित्त...* शिवश्री नितीन सावंत यांचे बुलढाण्यात व्याख्यान

म.फुले जन्मशताब्दी वर्ष व राजर्षी शाहू म.जयंती निमित्त...
* शिवश्री नितीन सावंत यांचे बुलढाण्यात व्याख्यान 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        महात्मा ज्योतिराव फुले व राजर्षी शाहू महाराज या दोन्ही युगपुरुषांनी समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. त्यांचे विचार घेऊन सदोदित वेगळा विचार देणाऱ्या मराठा सेवा संघाने यावर्षी फुले जन्मशताब्दी वर्ष व राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या पर्वावर व्याख्यानरुपी वैचारिक मेजवानी ठेवली आहे. सोबतच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील केला जात आहे. 

        27 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजित सदर कार्यक्रम शरद कला महाविद्यालय, हाजी मलंग दर्ग्याच्या पाठीमागे, चिखली रोड बुलढाणा या ठिकाणी होत आहे.
शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार व आजचे वास्तव या विषयावर पुरोगामी विचारांचे गाढे अभ्यासक शिवश्री नितीन सावंत मांडणी करणार आहे.
        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजिनीयर शिवश्री रविकांत काळवाघे जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ आहे. तर दलितमित्र शिवश्री माधवराव हुडेकर, शिक्षणाधिकारी अनिल आकाळ प्रमुख अतिथी आहे. शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थी व विविध गुणवंत मान्यवर यांचा सत्कारही यावेळी केले जात आहे. सदर कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मराठा सेवा संघाने केले आहे.