दे.राजा : (एशिया मंच न्यूज )
देऊळगा राजा नगरपरिषद बांधकाम समिती सभापती विष्णू झोरे यांच्या संकल्पनेतून 2 मे रोजी नगर सेवक आपल्या दारी या उद्देशाने भगवान बाबा मंदिर येथे वार्ड क्रमांक ५ च्या नागरिकांच्या समस्यांची निवारण सभा आयोजित करण्यात आली . प्रभाग क्रमांक 5 मधील जनतेने राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे विष्णू झोरे यांना निवडून दिल्यानंतर त्यांनी या प्रभागाच्या सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिने कामाला सुरुवात केली असुन प्रथम टप्प्यात नगर सेवक आपल्या दारी हा उपक्रम राबवून या प्रभागातील नागरिकांच्या नगर परिषदेच्या विषयी ज्या समस्या आहेत त्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी कऱण्यात आली.सदर सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे हे होते. तर निवारण सभेसाठी नगरपरिषद उपाध्यक्षपती राजेश भुतडा , बालकल्याण सभापतीपती विकास कासारे, गटनेते प्रदीप वाघ यांच्या सह भगवान बाबा नगर, समता कॉलनी, स्वामी विवेकानंद नगरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सदर सभेमध्ये नवीन नळ कनेक्शन जोडणे , ठिकठिकाणी विद्युत पोल उभारणे, पिण्याचे पाणी कमीत कमी आठ दिवसात नळाद्वारे पुरवठा करणे, नवीन नाली व रोड चे बांधकाम करणे, भगवान बाबा नगर मध्ये सांडपाणी समस्या व रस्ता समस्याचे निराकरण करणे, सुरू असलेले रस्त्याचे काम चांगले दर्जाचे करणे यावर संबंधित उपाध्यक्ष ,बांधकाम सभापती ,गटनेते, व कासारे यांनी त्वरित समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. तसेच भगवान बाबा मंदिर परिसर सुशोभित करणे, नालंदा वाचनालयाच्या परिसराचा विकास करणे ही कामे प्राधांन्याने केली जाईल अशी ग्वाही दिली. प्रथमच नगरसेवक आपल्या दारी येऊन समस्या जाणून घेऊन त्याचे सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करत असल्यामुळे नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच नगरसेवक आपल्या दारी येऊन समस्या जाणून घेऊन त्याचे निवारण करणे, त्या प्राधान्य क्रमाने सोडून दिल्या जाईल, अशी आश्वासन दिले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबनराव नागरे यांनी तर आभार धुमाळ सर यांनी मानले.
