आशाताईंच्या निधनाने संगीत क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी * केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केल्या दुःखद संवेदना

आशाताईंच्या निधनाने संगीत क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी 
 * केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केल्या दुःखद संवेदना
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        आशा भोसले ह्या प्रतिभासंपन्न गायिका होत्या त्यांच्या निधनामुळे संगीत विश्वाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे,  अशी दुःखद संवेदना केंद्रीय आयुष , आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली.
       ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दुःख व्यक्त केले आहे. संगीतातील त्यांच्या व्यापक योगदानामुळे त्यांनी संगीत रसिकांच्या अनेक पिढ्यांवर राज्य केले . आठ दशकांच्या सांगीतिक कारकिर्दीत त्यांनी असंख्य अजरामर गीते सादर करून भारताच्या सांस्कृतिक परंपरेला समृद्ध केले. आशाजींची कलेप्रती बांधिलकी ही भावी पिढ्यांमधील कलाकारांना प्रेरणा देत राहील, अशी दुःखद संवेदना केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत .