* डॉ. शोन चिंचोले विदर्भ नेत्र परिषदेच्या अध्यक्षपदी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
प्राख्यात नेत्र तज्ञ व समाजकार्यात अग्रेसर बुलढाणा येथील डॉ.शोन चिंचोले यांची विदर्भ नेत्र परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यवतमाळ येथे शानदार पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी पद्मश्री लहाने, यवतमाळ पोलिस अधीक्षक चिंथा, राज्यस्तरातून आलेल्या नेत्र तज्ञांची तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली. विदर्भातील नेत्र सेवा अधिक गतिमान करण्याची गरज असल्याचे डॉ. शोण चिंचोले यावेळी म्हणाले.
विदर्भ नेत्रपरिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ५१ वे अध्यक्ष म्हणून डॉ. शोन चिंचोले यांनी पदग्रहण केले. यवतमाळ येथे पार पडलेल्या या भव्य समारंभात नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यामध्ये डॉ. बाहेती , डॉ. रेवणवार आणि डॉ. सुबोध पुरोहित यांचे मोलाचे योगदान लाभले. या पदग्रहण सोहळ्यात अखिल भारतीय नेत्र परिषदेच्या सायंटिफिक कमिटीच्या चेअरमन डॉ. प्रा. नम्रता शर्मा यांच्या हस्ते पदग्रहण पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री प्रा. डॉ. टी. पी. लहाने यांनी मार्गदर्शन केले, तर यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी उपस्थितांना संबोधित केले. डॉ. प्रा. रागिणी पारेख तसेच विदर्भातील विविध जिल्ह्यांतील अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसंगी नेत्रविकारांवर आधारित विशेष शास्त्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या सत्रामध्ये बाल नेत्रदोष, मोतीबिंदूवरील आधुनिक उपचार पद्धती, प्रगत तांत्रिक शस्त्रक्रिया तसेच विविध नेत्रविकारांबाबत सखोल माहिती देण्यात आली. जनजागृती अभियानाद्वारे सर्वसामान्यांपर्यंत नेत्रसेवा पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात विदर्भ नेत्रपरिषदेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा स्व. डॉ. गंदेवार ओरिएशन अवॉर्ड यंदा डॉ. हेमनशू मटालिया यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मावळते अध्यक्ष डॉ. विरल शहा, सेक्रेटरी डॉ. शमिक मुकदम आणि कोषाध्यक्ष डॉ. दळणकर यांनी आपला पदभार नवनिर्वाचित कार्यकारिणीकडे सुपूर्द केला.
* नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी :
अध्यक्ष – डॉ. शोन चिंचोले
नियुक्त अध्यक्ष २०२७ – डॉ. अभिजीत पाटील उपाध्यक्ष, डॉ. अतुल काढणे सचिव, डॉ. सुबोध पुरोहित कोषाध्यक्ष, डॉ. शामिक आंबटकर सहसचिव, डॉ. सौरभ मुंदडा चेअरमन (सायंटिफिक कमिटी), डॉ. राहुल तिवारी
सह चेअरमन, डॉ. नेहा देशपांडे
सदस्य, डॉ. नवीन सोनी, डॉ. रोहिणी जुनेजा, डॉ. निखिल कुंडुरवार
कार्यकारी समिती सदस्य : डॉ. शुभम मालपाणी (अकोला), डॉ. मुर्तुजा हुसेन (अकोला), डॉ. आयुष सांगोळे (अमरावती), डॉ. राधिका लोखंडे (अमरावती), डॉ. सोनल आंबटकर (नागपूर), डॉ. अमृता वैरागडे (नागपूर), डॉ. प्रतिमा विश्वकर्मा (नागपूर), डॉ. अपर्णा गुप्ता (गोंदिया), डॉ. प्रफुल डाके (बुलढाणा), डॉ. स्मिता चव्हाण (यवतमाळ)
पर्यवेक्षक समिती सदस्य : डॉ. शुभांगी भावे, डॉ. धनंजय मोडक, डॉ. दिलीप जोगनपुत्रा, डॉ. दीपक बत्रा, डॉ. गोपाल अरोरा, डॉ. अनिल हरवानी, डॉ. अनुराधा राठोड, डॉ. तोटे यांची निवड करण्यात आली.
* नेत्र सेवा सामान्यांपर्यंत पोचविण्याची गरज : डॉ.चिंचोले
नवीन अध्यक्ष डॉ. शोन चिंचोले यांनी आपल्या मनोगतात विदर्भातील नेत्रसेवा अधिक सक्षम, आधुनिक व जन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला. त्यांनी विशेषतः बाल नेत्रदोष निवारण (मायोपिया क्लिनिक), मधुमेह व रक्तदाबामुळे होणाऱ्या नेत्रविकारांवरील जनजागृती, तसेच काचबिंदू (ग्लुकोमा) प्रतिबंध व उपचार यावर भर देण्याचे नमूद केले. तसेच वैद्यकीय सेवेत येणाऱ्या कायदेशीर बाबी, डे-केअर सर्जरी, मेडिकल लीगल विषय तसेच मेडिकल इन्शुरन्स कंपन्यांचा सहभाग याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. अनधिकृत व भोंदू वैद्यकीय उपचारांवर आळा घालण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज त्यांनी अधोरेखित केली.
