जैन समाजाच्या सर्व घटकांच्या सामजिक व आथिर्क उन्नतीसाठी ठोस उपाय योजना राबविण्याचे निर्देश

जैन समाजाच्या सर्व घटकांच्या सामजिक व आथिर्क उन्नतीसाठी ठोस उपाय योजना राबविण्याचे निर्देश
दे.राजा : (एशिया मंच न्यूज )
         अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाला गती देण्याच्या दृष्टीने  29 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री व अल्पसंख्यांक मंत्री सुनेत्राताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली, अल्पसंख्यांक कार्यमंत्री माधुरीताई मिसाळ, जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे महामंडळाची आढावा बैठक संपन्न झाली.

        यावेळी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावांचे तातडीने परीक्षण करून पुढील कार्यवाहीसाठी ते सादर करण्याच्या सूचना मंत्री महोदया यांनी दिल्या. जैन समाजाच्या सर्व घटकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले. महामंडळाच्या कामकाजासाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे यावेळी स्पष्ट केले.

       बैठकीत अल्पसंख्याक विकास विभाग सचिव योगेश म्हसे, नितेश नहाटा, रावसाहेब पाटील, संदीप भंडारी, विकास अच्छा आदी उपस्थित होते.