बुलढाणा तालुक्यात ‘जनगणना 2027’ साठी प्रगणक-पर्यवेक्षक प्रशिक्षणास सुरुवात* 389 प्रगणक व 70 पर्यवेक्षकांना मार्गदर्शन ; 8 मेपर्यंत प्रशिक्षण

बुलढाणा तालुक्यात ‘जनगणना 2027’ साठी प्रगणक-पर्यवेक्षक प्रशिक्षणास सुरुवात
* 389 प्रगणक व 70 पर्यवेक्षकांना मार्गदर्शन ; 8 मेपर्यंत प्रशिक्षण
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
          ‘जनगणना 2027’ या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून बुलढाणा तालुक्यात प्रगणक व पर्यवेक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण वर्गास सुरुवात झाली आहे. प्रधान जनगणना अधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे व जिल्हा जनगणना अधिकारी सुरेश कव्हळे यांच्या मार्गदर्शनाखाली 27 एप्रिल रोजी भादोला येथील सेंट जोसेफ महाविद्यालयात प्रशिक्षणाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
        या प्रशिक्षण मोहिमेसाठी तालुक्यात एकूण 10 बॅचेसची रचना करण्यात आली असून 389 प्रगणक आणि 70 पर्यवेक्षक अशा एकूण 490 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. 23 एप्रिल ते 8 मे 2026 या कालावधीत हे प्रशिक्षण चालणार आहे. प्रशिक्षणामध्ये 1 मे पासून सुरू होणाऱ्या ‘स्वगणना’ (Self-Enumeration) तसेच 16 मे ते 14 जूनदरम्यान होणाऱ्या ‘घरगणना’ प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे.
       उद्घाटन प्रसंगी तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी सांगितले की, “जनगणना ही केवळ आकडेवारी संकलन प्रक्रिया नसून देशाच्या भविष्यातील धोरणनिर्मितीचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येकाने हे राष्ट्रीय कर्तव्य समजून अचूक व जबाबदारीने काम करावे. या प्रशिक्षणाचे नियोजन व संचालन चार्ज अधिकारी तथा तहसीलदार विठ्ठल कुमरे, जिल्हा समन्वयक ऋषिकेश वराडे, नायब तहसीलदार सुनील अहेर यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. महसूल सहाय्यक अनिल देठे कार्यालयीन समन्वय सांभाळत आहेत. फिल्ड ट्रेनर म्हणून मकरंद बावस्कर, वाघ सर, एकलव्य धंदर, उद्धव जाधव, राहुल सोनूने, कड सर हे प्रशिक्षण देत आहेत. तांत्रिक सहाय्यासाठी ऑपरेटर अमोल वाठोरे यांचे सहकार्य लाभले.