* केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नाला यश
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
वारी हनुमान ते सलवान राम सेतू केबल स्टेड एफओबी पादचारी पुलाच्या बांधकामा संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी वन मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्याला यश आले असून वन विभागाने ह्या पादचारी फुल बांधण्यास परवानगी दिली आहे .
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्या अंतर्गत येणाऱ्या वारी हनुमान ते सलवान दरम्यान पुल बांधण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांची होती सदरहू क्षेत्र हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पच्या बफर झोन क्षेत्र वन्यजीव विभागाअंतर्गत येत असल्यामुळे वन विभागाची परवानगी यासाठी हवी होती. केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी या संदर्भात वन मंत्रालयाकडे पाठपुरावा केला त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून वन्यजीव विभागाच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या बफर वारी हनुमान येथे रामसेतू केबल स्टेड ए एफओबी पादचारी फुल बांधण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ही या पुलाची डिझाईन व निविदाही काढण्यात आली आहे. सुमारे 746.40 लक्ष रुपयाचा हा फुल बांधण्यात येणार असून या फुलाची उंची पायापासून 45.800 उंच एवढी आहे. केबल स्टेड एफओबीद्वारे हा जोडल्या जाणार आहे. या पुलामुळे वारी ते सलवान येथे जाणे येण्यासाठी पर्यटकासह पादचाऱ्यांना सोयीचा होणार आहे .
