जल्लोष भीम जयंतीचा महोत्सव विचारांचा * सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन* आनंद शिंदेंची "शिंदेशाही" मुख्य आकर्षण

जल्लोष भीम जयंतीचा महोत्सव विचारांचा 
* सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन
* आनंद शिंदेंची "शिंदेशाही" मुख्य आकर्षण 
बुलडाण : (एशिया मंच न्यूज )
         राष्ट्रपिता जोतीराव फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2026 च्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त येत्या 11 एप्रिल ते 14 एप्रिल असे चार दिवस विविध सांस्कृतिक व वैचारिक कार्यक्रम जल्लोसात पार पडणार आहेत. या तीन दिवशी कार्यक्रमात बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पवन भालेराव यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. 
        पत्रकार परिषदेत माहिती देताना पवन भालेराव म्हणाले की, सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने 11 एप्रिल रोजी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचे जयंती दिनी खास आकर्षण असलेले सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या बुद्ध भीम गीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिजामाता प्रेक्षगाराच्या भव्य प्रांगणात सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार संजय गायकवाड राहणार असून अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक अमोल हिरोळे तर विशेष उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष सौ. पुजाताई गायकवाड, बुलढाणा अर्बनचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी अश्रूजी मामा शेवाळे, डॉ. शितल इंगळे, आशिष खरात, डी.एस. लहाने, शिवाजी तायडे, एड. गणेश इंगळे, संजय हाडे, विनोद बेडवाल, गजेंद्र दांदळे, सतीश पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दि. 12 एप्रिल रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक युवकांचे आयकॉन विठ्ठल कांगणे सर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. गांधी भवन येथे सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या या व्याख्यान कार्यक्रमाचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते होणार आहे तर अध्यक्षस्थानी माजी सभापती दिलीपभाऊ जाधव राहणार असून विधान परिषदेचे आ. धीरज लिंगाडे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर, जयश्रीताई शेळके, माजी आ. विजयराज शिंदे, आदिती अर्बनचे सुरेश देवकर, शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत, शाहीर डी.आर. इंगळे, काँग्रेसचे नेते संजय राठोड, जितेंद्र मेढे, विजय अंभोरे, एड. सुमित सरदार, दादासाहेब काटकर, संदीप शेळके, दत्ता काकास, राजेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.                सोमवार 13 एप्रिल रोजी सुप्रसिद्ध गायक संतोष जोंधळे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे करणार असून सहाय्यक निबंध गीतेशचंद्र साबळे अध्यक्ष स्थानी राहणार आहेत. यावेळी डॉक्टर अर्चित हिरोळे, न.पा. चे गट नेते कुणाल गायकवाड, ऍड. जयमंगल धनराज, व्हाइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के, सुधाकर आहेर, विजय मोरे, सिद्धार्थ आराख, सुनील सपकाळ उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी रात्री 12 वाजता गांधी भवन येथे फटाक्याची आतशबाजी करून भीम जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. 14 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता भीम पाळणा होईल. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माजी सैनिक, पोलीस बँड पथक, समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात येणार आहे. तर दुपारी 4 वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या संपूर्ण तीन दिवसाच्या कार्यक्रमास बौद्ध उपासक उपासिकानी तसेच बहुजन बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष पवन भालेराव यांनी केले. पत्रकार परिषदेला विनोदी इंगळे, प्रशांत जाधव, अमोल खरे, उमेश हिलोडे, निलेश गायकवाड, राहुल कासारे, निलेश राऊत, सनी पैठणी, अमोल वाठोरे, संजय मोरे उपस्थित होते.