बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने ८ ते ११ एप्रिल २०२६ दरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गोपाल शेषराव निळकंठ यांनी दिली आहे.
याबाबत स्थानिक पत्रकार भवनात ६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महिला अध्यक्षा वंदना गोपाल निळकंठ, कार्याध्यक्ष नीलेश गोरे, सुरेश चौधरी, रंजना पवार, महिला कार्याध्यक्ष विशाखा गोरे, सावता मंडळाचे अध्यक्ष के. टी. पांडव, कार्याध्यक्ष गजानन हुडेकर, सचिव रमेश हुडेकर, लक्ष्मीकांत बगाडे, आशिष लहासे, प्रदीप डांगे, विशाल सुरुशे, वैभव इंगळे, सचिव पी. एन. बोदडे, प्रसिध्दी प्रमुख हर्षनंदन वाघ आदी उपस्थित होते.
गोपाल निळकंठ पुढे म्हणाले की, यावर्षी महात्मा फुले जयंतीनिमित्त समाज प्रबोधनात्मक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महात्मा फुले माध्यमिक शाळेत आयोजित रक्तदान शिबिर व १८ तास अभ्यास कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.अभिलाश माळी यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्ष सुरेश चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून सुरेश देवकर, शंकर राऊत, सचिन खडके, अक्षय वानखेडे, मनिषा राऊत, दिपीका हुडेकर यांची उपस्थिती राहणार आहे. ९ एप्रिल २०२६ रोजी धाड नाका येथून सकाळी १० वाजता महात्मा फुले वाडा, पुणे ते बुलढाणा मशाल रॅलीचे स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी आशिष लहासे, वैभव इंगळे, कृष्णकांत बगाडे, प्रदीप डांगे, निलेश दांडगे, वैभव लाड यांची उपस्थिती राहणार आहे. तर संध्याकाळी ७ वाजता बुलढाणा बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी उद्घाटक महेश अप्पा जतकर, रमेश उबाळे, प्रवीण निमकर्डे, प्रकाश लहासे, सदानंद माळी, विजया कोळसे, राजू गोरे, गौरव इंगळे, अनंता लहासे, मनोज पवार, राजेंद्र पवार, मनोज जाधव, विठ्ठल जाधव यांची उपस्थिती राहणार आहे. १० एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता महिला जागर कार्यक्रमांतर्गत वेषभूषा व महिलांचे विविध खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात अमरावती येथील ईश्वरी कांजरे यांचे व्याख्यान, बालशिवाजी कॉन्हेंटचे पथनाट्य, आनंद मेळावा, वेषभूषा, उखाणे स्वर्धा, बलून गेम, महात्मा फुले यांच्या कार्यावरती रिल्स व प्रश्न मंजुषा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी वैशाली ठग राहणार आहेत.
यावेळी वंदना गोपाल निळकंट, शाहिणा पठाण, उज्ज्वला काळे, जरांजपे, कवित्री तायडे, डॉ.दिशा चोपडे, डॉ.अश्विनी जाधव, वंना काकडे, मंजुषा खोब्रागडे, स्नेहलता मानकर, स्वाती कान्हेर, सुभद्रा इंगळे, रंजाना पवार, गिता गोरे, विशाखा गोरे, मनिषा मोरे यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच संध्याकाळ ८ वाजता महात्मा फुले माध्यमिक शाळेत पुरस्कार वितरण व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन विश्वनाथ माळी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी बाळासाहेब गिऱ्हे, सुधाकर अहेर, गजानन घिरके, त्र्यंबक भराड आदींची उपस्थिती राहणार आहे. ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपासून शहरातील विविध ठिकाणी महापुरूषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. कार्यक्रमांचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी किर्ती दिपक चौधरी, प्रिती प्रदीप डांगे, प्रिती विशाल खंडारे, राजेश मोहळे, रविंद्र भागवत, भैय्यासाहेब मारोडकर, भानुदास हुडेकर, निलेश तायडे आदींची उपस्थिती राहणार आहे. तर संध्यकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, संगम चौकातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी उद्घाटन आ.संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी आ.धिरज लिंगाडे, कुणाल गायकवाड, हर्षवर्धन सपकाळ, जयश्रीताई शेळके, विजयराज शिंदे, जालिंधर बुधवत, डि.एस.लहाने, डॉ.शोण चिंचोले, शिवाजीराव तायडे, चंद्रशेखर माळी, प्रकाश वानेरे, माधवराव हुडेकर, पी.सी.चौधरी, के.टी.पांडव, बाळासाहेब गिऱ्हे, सुरेश चौधरी, सुधाकर अहेर, लक्ष्मीकांत बगाडे, विष्णु उबाळे, सतिष उबाळे, उमेश सातव, प्रा.शिवशंकर गोरे, विठ्ठल सोनुने, पवन सोनारे, सतिष हुडेकर, गणेश एकडे, अरूण सौभागे, विजयकुमार जाधव आदींची उपस्थिती राहणार आहे.
