दीपक मोरे यांची टीव्ही जर्नालिस्ट अँड डिजिटल मीडिया असोसिएशन च्या तालुका अध्यक्षपदी निवड


दीपक मोरे यांची टीव्ही जर्नालिस्ट अँड डिजिटल मीडिया असोसिएशन च्या तालुका अध्यक्षपदी निवड
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         टीव्ही जर्नलिस्ट अँड डिजिटल मीडिया असोसिएशनच्या बुलढाणा तालुका अध्यक्षपदी पत्रकार दीपक मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. टीव्ही जर्नलिस्ट अँड डिजिटल मीडिया असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राहुलभाऊ पहुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुलढाणा शासकीय विश्रामगृह या ठिकाणी संघटनेची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये तालुकाध्यक्ष निवडणे संदर्भात चर्चा करण्यात आली. यामध्ये बुलढाणा तालुकाध्यक्षपदी दीपक मोरे यांची सर्वानुमते निवड झाल्याचे जिल्हाध्यक्ष फहीम देशमुख यांनी जाहीर केले.
          यावेळी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी संजय जाधव, संदीप शुक्ला, संदीप वानखेडे, वसीम शेख, प्रफुल्ल खंडारे, अमोल गावंडे, निलेश राऊत यासह इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.