CRF अंतर्गत जिल्ह्यात रस्ते निर्मितीसाठी निधी द्या* केंद्रीयरस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली मागणी

CRF अंतर्गत जिल्ह्यात रस्ते निर्मितीसाठी निधी द्या
*  केंद्रीयरस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली मागणी 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         जिल्ह्यात CRF अंतर्गत रस्ते मार्ग निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे.

       रस्ते हे देशाच्या प्रगतीचे मुख्य महामार्ग असून ते आर्थिक विकास, दळणवळण आणि सामाजिक एकत्रीकरणाचा कणा आहे.आधुनिक व सुसज्ज रस्ते कृषी, उद्योग आणि व्यापाराला गती देऊन ग्रामीण भागाला शहरांशी जोडून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचं काम करतात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाच्यावतीने बुलढाणा लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारच्या वतीने महामार्गांची निर्मिती झाली परंतु अजूनही काही महामार्गांची निर्मिती CRF अंतर्गत झाल्यास जिल्ह्यात दळणवळणाची सुविधा नागरिकांना निर्माण होईल . या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या महामार्गांना निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची  18 मार्च रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे. सोबतच जिल्ह्यातील नांदुरा येथील रेल्वे क्रॉसिंगवर ब्रिज नसल्याने या रस्त्यावरून जळगाव जामोद संग्रामपूर या आदिवासीक्षेत्र भागाकडे जाणाऱ्या वाहतुकीला नांदुरा येथे रेल्वे क्रॉस होईपर्यंत थांबावे लागते या क्रॉसिंगवर ब्रिज किंवा अंडरपास निर्माण व्हावा अशी नागरिकांची इच्छा आहे जनभावनेचा विचार करता या कामाला गती द्यावी अशी मागणी ही केंद्रीय आयुष्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या भेटीदरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे . जिल्ह्यातील विकासात्मक रस्ते मार्गासाठी सहकार्य करण्याचा आश्वासन यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नामदार प्रतापराव जाधव यांना दिले आहे .