बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
तालुक्यातील खुपगाव येथे शेकडो वर्षांपासून देवीच्या यात्रेची परंपरा आहे. देवीचे सोंग हे या यात्रेचे प्रमुख आकर्षण असते. शेतकरी नेते रविकांत तुपकर दरवर्षी या यात्रेला भेट देऊन मनोभावे पूजा करतात. या वर्षी देखील रविकांत तुपकर गावात यात्रेत पोहोचले.
यावेळी भाविकांच्या आग्रहास्तव तुपकरांनी डफड्याच्या तालावर ठेका धरला. पारंपरिक वाद्याच्या चालीवर पारंपारिक ताल धरून तुपकरांनी सर्वांचे मने जिंकली. देवीच्या सोंगासमोर देवीला पावली दाखवत तुपकर यांनी पारंपरिक नृत्य सादर करून ग्रामीण संस्कृती आणि परंपरेशी त्यांची नाळ कायम असल्याचे दाखवून दिले. तसेच स्वतः डफडे वाजवून वाजवणारे व इतर ग्रामस्थांचा उत्साह वाढविण्याचे काम देखील केले. रविकांत तुपकरांचे हे आगळे वेगळे रूप पाहून ग्रामस्थ आणि भाविक अवाक झाले होते.
