मेंदू व कर्करोग आजारांबाबत जागरूकता अत्यंत आवश्यक – तज्ञांचे मत

मेंदू व कर्करोग आजारांबाबत जागरूकता अत्यंत आवश्यक – तज्ञांचे मत
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
          आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मेंदूचे आजार आणि कर्करोग यांचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. याबाबत समाजात योग्य माहिती आणि वेळेवर निदान यांची गरज अधिक महत्त्वाची ठरत आहे, असे मेडिकोवर हॉस्पिटल चे डॉ. मिलिंद दुनाखे व डॉ. श्रुती सुरोसे यांनी सांगितले.
          मेंदूशी संबंधित आजारांमध्ये स्ट्रोक, मिरगी, मेंदूतील गाठी (ब्रेन ट्यूमर), अल्झायमर यांसारख्या विकारांचा समावेश होतो. तसेच उष्मा घात हा पण एक आजार आहे . डोकेदुखी, चक्कर येणे, स्मरणशक्ती कमी होणे, बोलण्यात अडथळा येणे, अचानक अशक्तपणा जाणवणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत, असे मत डॉ. मिलिंद दुनाखे, मेंदू विकार तज्ञ यांनी सांगितले. वेळेत उपचार घेतल्यास गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात. कर्करोग हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार असला तरी सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास त्यावर यशस्वी उपचार शक्य आहेत. स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, तसेच मेंदूतील कर्करोग (ब्रेन कॅन्सर) यांचे प्रमाण वाढत आहे. तंबाखूचे सेवन, असंतुलित आहार, प्रदूषण, ताणतणाव ही यामागील प्रमुख कारणे आहेत.
डॉ. श्रुती सुरुशे, कर्करोग तज्ञ यांच्या मते, नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, व्यायाम, तंबाखू व मद्यपान टाळणे, मानसिक आरोग्याची काळजी घेणे या गोष्टींमुळे मेंदूचे आजार आणि कर्करोगाचा धोका कमी करता येतो.
         आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे अचूक निदान शक्य झाले आहे. योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. समाजात जागरूकता वाढवण्यासाठी विविध आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहीम,  सल्ला सत्रांचे आयोजन मेडिकवर हॉस्पिटल तर्फे वेळोवेळी केले जाते, असे सेंटर हेड डॉ विशाल कुटे यांनी सांगितले.