दे. राजा : (एशिया मंच न्यूज )
देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना , सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, जनसेवा सामाजिक संघटना, व जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने पोलिस दलात नुकतीच निवड झालेल्या पिंपळनेर येथील कुमारी ज्योतीताई शेषराव पाटोळे तसेच पत्रकार मुशिरखान कोटकर यांना राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा आज 24 मार्च रोजी विरंगुळा भवन येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष बळीराम मापारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून के.पी.खांडेभराड, विनायकराव कुळकर्णी, गोविंदराव अहिरे हे होते. यावेळी शांतिलाल निरफळे, प्रा.विजयकुमार रायमल यांनी सत्कारमूर्तीच्या कार्याचा गौरव करीत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती यांनी सत्काराला उत्तर देताना संघटनेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी प्रा.अशोक डोईफोडे, घनश्याम भंडारे, बाबुलाल शिवरकर, अरुण सपाटे, प्रकाश दत्तवाल, विठ्ठल पाटोळे, लक्ष्मण हिवाळे यांच्यासह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव गोविंद बोरकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
