बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
जिल्ह्यातील जवळ जवळ १०० महिला खेळाडू चा सहभाग -बुलढाणा केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजनेतर्गत बुलढाणा जिल्हा तलवारबाजी असोसिएशन च्या वतीने अस्मिता लीग तलवारबाजी क्रीडा स्पर्धा रविवार २२ मार्च ला बुलढाणा येथील शरद कला महाविद्यालयातील इनडोअर हॉल मध्ये पार पडल्या.
या स्पर्धेत जिल्ह्यातील १०० महिला खेळाडू सहभागी झाल्या. स्पर्धेचे उदघाटन जिल्हा क्रीडाधिकारी बाळकृष्ण महानकर यांच्याहस्ते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद कला महाविद्यालया च्या अध्यक्षा सौ. सिंधूताई विष्णूपंत पाटील होत्या. प्रमुख पाहूणे म्हणून राजर्षी शाहू मल्टिस्टेट बॅकेच्या अध्यक्षा सौ. मालतीताई शेळके, तालुका क्रीडाधिकारी मंडलेसर आदी उपस्थित होते. प्रमुख अतिथिनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. तर समारोप प्रसंगी शरद कला महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष, प्राचार्य विष्णूपंत पाटील यांच्य हस्ते तर प्रमुख उपस्थित नायब तहसीलदार सुनिल आहेर, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष मयूर बाहेकर, जिल्हा रस्सीखेच संघटनेचे सचिव श्रीराम निळे यांच्याहस्ते खेळाडूंना मेडल व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. स्पर्धेचे पंच म्हणून आकाश बनसोडे, शुभम सुरडकर यांनी काम पाहिले, स्पर्धा पार पाडण्यासाठी गणेश सावळे, बाळकृष्ण जाधव, जिवन जाधव, अनिल वाघमारे, कु. मीना जगताप यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन नितीन जेऊघाले, प्रास्ताविक व आभार शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शेषनारायण लोढे यांनी केले.
