एकल महिलांच्या मुलांना स्वीकारून लग्न करण्याची तयारी ठेवा : तुमचे लग्न सहज होतील* लग्नाळू तरुणांना प्रा. लहाने यांचे आवाहन !

एकल महिलांच्या मुलांना स्वीकारून लग्न करण्याची तयारी ठेवा : तुमचे लग्न सहज होतील
* लग्नाळू तरुणांना प्रा. लहाने यांचे आवाहन !
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        प्रत्येक गावामध्ये तरुण मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही, लग्नाळू तरुणांनी एकल महिलांच्या मुलांना स्वीकारून त्यांच्यासोबत लग्न करण्याची मानसिकता ठेवावी व आयुष्याला जोडीदार मिळवून सुखी जीवन घालवावे असे आवाहन मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी.एस. लहाने यांनी केले आहे.

          महाराष्ट्र मराठा सोयरीक संभाजीनगर व मानस फाउंडेशनच्या वतीने आयोजित मराठा समाज व एकल, महिलांचा परिचय
मेळावा पानवडोद खुर्द ता. सिल्लोड, जिल्हा संभाजी नगर येथे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष कावळे पाटील होते. उद्घाटक म्हणून मराठा सोयरिक चे अध्यक्ष पोपटराव सातपुते, विजय दौंड, प्रकाश गाडेकर यांची विशेष उपस्थिती लाभली.
          परिचय मेळाव्यास मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये तरुण-तरुणी यांच्यासह पालकही उपस्थित झाले.विधवा, विधुर ,घटस्फोटीत यांचा समावेशही दखलपात्र होता. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पुढे बोलताना प्रा.डी.एस. लहाने म्हणाले, एखाद्या महिलेवर दुःखाचा डोंगर कोसळतो, जेव्हा तिचा आयुष्याचा जोडीदार सोडून जातो, यामध्ये तिला दोषी धरणे योग्य नाही. अतिशय कमी वयामध्ये बऱ्याचशा मुली विधवा होतात. दुसरीकडे तरुणांना लग्नासाठी मुली मिळत हे चित्र सर्वत्र आहे. दोघेही अडचणीत आहे. गावा गावांमध्ये अनेक तरुण बिना लग्नाचे आहे. अनेकांची वय देखील बरेचसे झाले आहे. अशा वेळी काळाची पावले ओळखून लग्नाळू तरुणांनी विधवा, घटस्फोटीत महिलांशी लग्न करण्याचा विचार केल्यास दोघांनाही जोडीदार मिळू शकतो व जीवन सुखी जगता येऊ शकते. यात गैर काहीही नाही. हीच सामाजिक मानसिकता तयार करण्याचे काम मानस फाउंडेशन करीत असल्याचे ते म्हणाले. संतोष दौंड, गजानन दौंड तात्यासाहेब गावंडे यांनी भूमिका विशद केली. 
        पानवडोद खुर्द, पानवडोद बुद्रुक ग्रामपंचायत, सर्व सदस्य व ग्रामस्थांनी नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. आयोजक विजय अंभोरे व पोपटराव सपकाळ पाटील यांनी आयोजनाची भूमिका मांडली.असे मेळावे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाले पाहिजे, जेणेकरून लग्न जुळवणे ही अति अवघड झालेली समस्या सोडवण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.