समर्थ फार्मसीची हॉस्पिटल व्हिजिट

समर्थ फार्मसीची हॉस्पिटल व्हिजिट 
दे. राजा : (एशिया मंच न्यूज )
          श्री संत गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था द्वारा संचलित समर्थ येथे डी. फार्म, बी.फार्म व एम. फार्म हे कोर्सेस राबविण्यात येतात. यावर्षी महाविद्यालयाच्या डी. फार्म कोर्सला अतिउत्तम मानांकन यापूर्वीच मिळालेले आहे. महाविद्यालय सतत विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाकरता वेगवेगळे उपक्रम राबवत असते, त्यामध्ये हॉस्पिटल विजिट ,इंडस्ट्रियल व्हिजिट ,वॉटर पुरिफिकेशन युनिटची व्हिजिट गार्बेज ट्रीटमेंट व्हिजिट अशा वेगवेगळ्या उपक्रम राबवत असते. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या विषयांवर गेस्ट लेक्चर आयोजित केले जातात. महाविद्यालयाच्या डी.फार्म कोर्सच्या विद्यार्थ्यांना नुकतेच देऊळगावराजा येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी भेट देऊन रुग्णालयातील विविध विभागांची माहिती घेतली. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रवीण वानखेडे, ड्रग स्टोअर इन्चार्ज गणेश वणवे, आरोग्य सेवक प्रकाश चेके ,फार्मसीस्ट कविता काकड ,नर्सिंग इन्चार्ज रेखा जाधव, लॅब टेक्निशियन भारत राठोड, सीनियर क्लर्क गजानन मिसाळ, व्हॅक्सिन इन्चार्ज सोनाली बनकर या सर्व स्टाफ ने विद्यार्थ्यांना हॉस्पिटल विजीट करून दिली. 
             यावेळी औषधी वितरण ,ओपीडी, आयपीडी अशा विविध विभागांची विद्यार्थ्यांना सखोल माहिती देण्यात आली . याप्रसंगी महाविद्यालयातील 50 विद्यार्थी या व्हिजिट करता उपस्थित होते.
 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल ताठे, उपप्राचार्य डॉ. गोपालकृष्ण सीताफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर हॉस्पिटल विजिट घेण्यात आली. या विजिट करिता डी.फार्म स्टाफ मेंबर प्रा. एम. एस. पिंपळे ,प्रा .एस.पी. उगले , प्रा .यु. ए. पिंपळे यांनी परिश्रम घेतले. सर्व स्टाफ मेंबर्स हॉस्पिटल व्हिजिट करिता विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते.  विद्यार्थ्यांना हॉस्पिटल मधील विविध विभागांची सविस्तर व सखोल अशी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे या हॉस्पिटल व्हिजिटला प्रतिसाद देऊन संपूर्ण माहिती अवगत करून घेतली.