जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथे जागतिक पानथळ दिन साजरा
लोणार : (एशिया मंच न्यूज )
रामसर साईट असलेल्या लोणार सरोवर येथे 'मी लोणारकर' टीम व अकोला वन्यजीव वन विभाग अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक पानथळदिन २ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता पक्षी निरीक्षण, सरोवर भ्रमंती व स्वच्छता मोहिमेने चालू झाली पाणथळ जागा व पक्षांची माहिती महाराष्ट्र पक्षी मित्र जिल्हा समन्वयक तसेच 'मी लोणारकर' टीमचे सचिन कापुरे यांनी विद्यार्थ्यांना दिली.
पाणथळ जागेचे महत्त्व संतोष जाधव यांनी तर स्वच्छतेचे महत्व लोणार रेंज ऑफिसर वन्यजीव विभागाचे अधिकारी मनोज रामटेके यांनी विद्यार्थ्यांना दिली. सरदार वल्लभ भाई पटेल हायस्कल येथील शिक्षक वंद तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच 'मी लोणारकर, टीमचे विलास जाधव, उमेद चिपडे, सर्पमित्र विनय कुलकर्णी, कमलेश आगरकर, प्रकाश सानप, वनपाल सदाशिव वाघ, वनरक्षक पोले, ठाकरे व लोणार वन्यजीव विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
लोणार सरोवर महाराष्ट्रातील दुसरे, तर देशातील ४१ वे रामसर स्थळ ठरले आहे. जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाणथळ जागा उदा. तलाव, नद्या, खाड्या, दलदलीचे प्रदेश सरोवर यांचे संरक्षण करणे या हेतूने २ फेब्रुवारी ला आपण जागतिक पाणथळ दिवस साजरा करतो या वेळी ची थीम 'पाणथळ जागा आणि पारंपारिक ज्ञानः सांस्कृतिक वारसा साजरा करणे' अशी संकल्पना निवडण्यात आली आहे.
