बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
ज्ञानगंगा फॉरेस्ट ग्रुप
बुलडाणा व रणरागिणी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बुलडाणा अर्बन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांच्या पंचाहत्तर व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आ.संजय गायकवाड, नितीन चौधरी, शरद रांखुडे, महेश महाजन, संदीप शेळके, सौ. डॉ. अश्विनी जाधव, कोच प्रशांत राऊत, रवी पाटील यांनी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यासोबत रणर साऊथ कोरिया येथे आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करून आलेले ॲड शरद राखोंडे, संदीप शेळके, प्रशांत राऊत, डॉ. अजित घुले, गोवा येथे अर्ध आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण केलेले विराज महाजन त्याचप्रमाणे मिलिंद सोमन आयोजित पिंक कॅथलॉन 102 किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये डॉ. अश्विनी जाधव त्याचप्रमाणे बॉर्डर रन : इंडिया पाकिस्तान बॉर्डर-100 कि.मी.रन पूर्ण केलेले बालाजी नारागुडे, संतोष जाधव ,सुधीर कुलकर्णी यांचा सत्कार सहकार महर्षी राधेश्याम चांडक व आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या यांच्याहस्ते करण्यात आला . बुलडाण्याचे कॉम्रेड रनर नितीन चौधरी यांचे स्वागत व सत्कार कॉम्रेड रनर महेश महाजन व राधेश्याम चांडक यांनी केले. याप्रसंगी राधेश्याम चांडक व आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले. बुलडाण्यात मध्ये चांगले खेळाडू घडावे म्हणून योग्य ती सुख सुविधा निर्माण करून देण्याचे आश्वासनआ.गायकवाड यांनी दिले.
1 मार्च 2026 रोजी बुलडाणा अर्बन व ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर ग्रुप तर्फे फॉरेस्ट मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी भाईजींनी व आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी 1 मार्च रोजी बुलढाणा अर्बन मॅरेथॉन घेण्यात येत आहे, तरी या मॅरेथॉन मध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन याचा आनंद घ्यावा, असे आवाहन राधेश्याम चांडक व आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी याप्रसंगी आवाहन केले. त्याचप्रमाणे टाटा मुंबई मॅरेथॉन 2026 मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील भाग घेणारे सर्व खेळाडूंचे स्वागत सुद्धा करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानगंगा ग्रुपचे रवींद्र पाटील, किरण तायडे, स्वप्निल देवकर, सचिन गाढवे,महेंद्र सौभागे, बापूसाहेब गाढे व रणरागिनी क्लबचे सर्व महिला सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद राखोडे व रवींद्र पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वाती शेळके यांनी केले.
