'कॉर्पोरेट साथ, कॉर्पोरेट विकास’* केंद्रीय अर्थसंकल्प जनविरोधी असल्याची जयश्रीताई शेळके यांची टीका

'कॉर्पोरेट साथ, कॉर्पोरेट विकास’
* केंद्रीय अर्थसंकल्प जनविरोधी असल्याची जयश्रीताई शेळके यांची टीका
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ‘कॉर्पोरेट साथ, कॉर्पोरेट विकास’चा आहे. या जनविरोधी अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध, असे मत शिवसेना उबाठा प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी व्यक्त केले.

        केंद्रीय अर्थसंकल्प हा सर्वसामान्य जनतेसाठी नाही, तर काही मोजक्या उद्योगपतींसाठी तयार करण्यात आलेला अर्थसंकल्प आहे. महागाई, बेरोजगारी, शेतमालाला मिळणारा कमी दर, शिक्षण व आरोग्य व्यवस्थेतील ढासळती स्थिती यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर या अर्थसंकल्पात ठोस उपाययोजना नाहीत. पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिक आधीच त्रस्त असताना, त्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही.
         शेतकऱ्यांसाठी केवळ घोषणांचा पाऊस असून, कर्जमाफी, हमीभाव, उत्पादन खर्चावर आधारित दर याबाबत ठोस तरतूद दिसत नाही. रोजगार निर्मितीबाबत केवळ पोकळ आश्वासने आहेत. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला पुरेसा निधी देण्यात आला नाही, अशी प्रतिक्रिया जयश्रीताई शेळके यांनी दिली.