* जिल्हा आयुष अधिकारी डॉ.प्रशांत तांगडे यांनी केले मोलाचे मार्गदर्शन
शेगाव : (एशिया मंच न्यूज )
भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते श्रीक्षेत्र शेगाव येथे आयुष मंत्रालय, भारत सरकार व अखिल भारतीय आर्युवेद महासंमेलनाच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय 'राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026' चा अत्यंत उत्साहात काल शुभारंभ करण्यात आला. 26 रोजी या मेळाव्यात जिल्हा आयुष अधिकारी डॉ.प्रशांत तांगडे यांनी 3 हजार आशा स्वयंसेविका यांना आयुर्वेद, दिनचर्या, ऋतुचर्या,घरगुती आयुर्वेदिक उपचाराविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
26 फेब्रुवारीला या मेळाव्यात घरचा वैद्य "आजीबाईचा बटवा" घरगुती आयुर्वेदिक प्रथमोपचाराचे प्रशिक्षण सत्र संपन्न झाले. "आजीबाईचा बटवा"' या विशेष सत्राला बुलढाणा जिल्ह्यातील महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केंद्रीय आयुषमंत्री मा.ना.श्री. प्रतापरावजी जाधव यांनी उपस्थित राहून विशेष सत्राला सविस्तर मार्गदर्शन केले व संवाद साधला.
यावेळेस डॉ अमोल गिते यांची विशेष उपस्थिती लाभली.दरम्यान घरगुती उपचारांची शिदोरी: "आजीबाईचा बटवा" सत्रातून जिल्हा आयुष अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ 3 हजार आशा, स्वयंसेवीका यांनी घेतला.
