आमदार सिद्धार्थ खरात साहेब बनले निक्षय मित्र * 103 क्षय रुग्णाचे पोषण आहार साठी स्वीकारले पालकत्व!

आमदार सिद्धार्थ खरात साहेब बनले निक्षय मित्र 
*  103 क्षय रुग्णाचे पोषण आहार साठी स्वीकारले पालकत्व!
मेहकर : (एशिया मंच न्यूज )
      संसर्गजन्य आजारामुळे होणाऱ्या मृत्युमध्ये क्षयरोगाचा समावेश प्रमुख १० आजारामध्ये आहे. त्यामुळे संपुर्ण जगामध्ये व भारतामध्ये क्षयरोग आजाराचे व क्षयरोगामुळे होणऱ्या मृत्युचे प्रमाण लक्षणीय आहे. क्षयरुग्णांना उपचार कालावधीमध्ये पुरेसा पोषण आहार मिळाल्यास रोग बरा होण्याचे प्रमाण वाढते. उपचाराखाली असलेल्या रुग्णांना सामाजिक साहय मिळावे यासाठी सहमती दिलेल्या क्षयरुग्णांना उपचार कालावधी मध्ये पोषण आहार मिळावे ते बरे व्हावेत आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळावी यासाठी मेहकर लोणार मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी पुढाकार घेऊन त्यांनी 103 रुग्णांचे पालकत्व स्वीकारले असून ते आज "निश्चय मित्र" बनले आहेत. त्यामुळे क्षयरुग्णांना पोषण आहार निक्षय मित्राच्या माध्यमातुन देण्याचे प्रयोजन आहे.
         क्षयरुग्णां मध्ये पोषण आहार हा अतिशय महत्वाचा घटक आहे. क्षयरुग्णांसाठी केंद्र शासनाने प्रति व्यक्ती प्रति महिना आवश्यक प्रौढ क्षयरोग रुग्ण गहु ३ किलो, दाळ १.५ किलो, गोडेतेल २५० ग्रॅम, दुध पावडर १ किलो बाल क्षयरोग रुग्ण गहु २ किलो, दाळ १ किलो, गोडे तेल २५० ग्रॅम, दुध पावडर ७५० ग्रॅम इ. बाबत शासनस्तरावरुन क्षयरुग्णांना पोषण आहार देणे आवश्यक आहे.
          जिल्हयातील माहे १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत एकुण १६८२ क्षयरुगण औषधोपचार घेत आहे. त्यानुसार मेहकर मतदार संघात 103 रुग्ण आहेत त्यांचे पळकत्व एक जबाबदार आमदार म्हणून स्वीकारले आहे. आता या रुग्णांना नियमित पोषण आहार मिळणार आहे. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ वर्षा गुट्टे, मेहकरचे तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. विजय बलकार यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांना "मी निक्षय मित्र " फ्रेम देऊन स्वागत केले.