सहकार विद्या मंदिरचे स्काऊट गाइड मेळाव्यात वर्चस्व
मोताळा : (एशिया मंच न्यूज ) येथील सहकार विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळाव्यात शहरी विभागात आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत घवघवीत यश संपादन केले. या मेळाव्यात शाळेच्या गाईड पथकाने (मुली) शहरी विभागात प्रथम क्रमांक, तर स्काऊट पथकाने (मुले) तृतीय क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
राष्ट्रीय सैनिकी स्कूल (कोलवड ता. बुलढाणा) येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान उत्साहात पार पडला. या मेळाव्यात जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते. स्काऊट विभाग (मुले) (शहरी): मुलांच्या स्काऊट पथकाने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर तृतीय क्रमांक तर गाईड विभाग (मुली) शहरीः शिस्त, धाडस आणि विविध प्रात्यक्षिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शाळेने प्रथम क्रमांक मिळवला. या तीन दिवसीय मेळाव्यात विद्यार्थ्यांनी तंबू निवास, गाठी मारणे, प्रथमोपचार, साहसी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांचे बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, बुलडाणा अर्बन चॅरिटेबलच्या अध्यक्षा कोमल झंवर, मुख्याध्यापक अभिजीत देशमुख आणि शिक्षक वृंदातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांना शाळेचे स्काऊट मास्टर आणि गाईड कॅप्टन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
