राहुलभाऊ बोंद्रे यांची जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा निरीक्षकपदी

राहुलभाऊ बोंद्रे यांची जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा निरीक्षकपदी 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
          महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्याकडे सोपवली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांची जिल्हा निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रियेत समन्वय, मार्गदर्शन आणि संघटनात्मक बांधणीची प्रमुख जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.

          प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या आदेशावरुन प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी यासंदर्भात अधिकृत पत्र जारी केले आहे. या पत्रानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व आघाडी घटकांशी समन्वय साधून निवडणूक रणनिती प्रभावीपणे राबवण्याची जबाबदारी राहुलभाऊ बोंद्रे यांच्याकडे देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला भक्कम यश मिळवून देण्यासाठी नियोजन, समन्वय आणि कार्यकर्त्यांची मोट बांधण्याची जबाबदारी आता राहुलभाऊ बोंद्रे यांच्यावर असणार आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा फायदा काँग्रेसला निश्चितच होईल, अशी पक्षात अपेक्षा व्यक्त होत आहे.


* कर्नाटक, मध्यप्रदेश, अमरावतीनंतर आता छत्रपती संभाजीनगर : 

           राहुलभाऊ बोंद्रे यांनी यापूर्वी कर्नाटक व मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षासाठी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीतही त्यांनी निरीक्षक म्हणून प्रभावी कामगिरी बजावली. त्यामुळेच त्यांच्यावर पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने उल्लेखनीय यश मिळवले आहे. लोणार, मलकापूर व शेगाव येथे काँग्रेसचे नगराध्यक्ष विराजमान झाले असून जिल्ह्यात एकूण ६० काँग्रेस नगरसेवक निवडून आले आहेत. संघटन मजबूत करत तळागाळापर्यंत पक्ष पोहोचवण्याचे श्रेय राहुलभाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वाला जाते.