शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांचे हात मजबूत करण्यासाठी नगरपालिकेत शिवसेनेचे शिलेदार निवडून आणा
* हीच माझ्यासाठी वाढदिवसाची भेट : केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता होल्डिंग , डिजिटल बॅनर जाहिरातीवर खर्च न करता मला वाढदिवसाची भेट द्यायची असेल तर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी नगरपालिकेवर भगवा फडकवा आणि नगराध्यक्षासह जास्त संख्यने नगरसेवक निवडून आणा, असे आवाहन शिवसेना नेते तथा केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शिवसैनिकांना केले आहे.
शिवसेना नेते तथा केंद्रीय आयुष ,आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा वाढदिवस 25 नोव्हेंबरला जिल्हाभरात विविध कार्यक्रमाव्दारे शिवसैनिक साजरे करतात. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाभर डिजिटल होल्डिंग , जाहिरात बॅनर आणि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी भुमिपुत्रांचा वाढदिवस साजरा केला जातो. पण यावर्षी जून ते ऑक्टोबर पर्यंत जिल्हाभरात ठिकठिकाणी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी हवालदिल झालेला असतानाच शेतकऱ्यांना शासनातर्फे आर्थिक मदत मिळावी, यासाठी जिल्ह्याचे खासदार भूमिपुत्र प्रतापराव जाधव यांनी प्रयत्न केले . त्यांच्या प्रयत्नांना यशही आले आणि संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला. यावर्षी अतिवृष्टीमुळे रब्बी, खरीप पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. अतिवृष्टी जाहीर झाली, अशा वातावरणामध्ये वाढदिवस साजरा करणे योग्य नाही, अशी भावना भूमिपुत्र केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली. शिवसैनिकांनी येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेवर भगवा फडकवा, जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणावेत, शिवसेना पक्ष नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे हात बळकट करावे, हीच माझ्यासाठी वाढदिवसाची भेट राहील . तेव्हा शिवसेनेचे शिलेदार नगरपालिकेत निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करावा, असे आवाहन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचा जनसंपर्क कार्यालयातून शिवसेनिकांना करण्यात आले आहे .
