* कॉफी विथ पुणे पोलीस उपायुक्त कार्यक्रम उद्या !
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
पिंपरी चिंचवड पुणे येथील पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्याशी शिवशाही युनिवर्सचे बाल पत्रकार उद्या संवाद साधणार आहेत. मानस फाउंडेशन द्वारा आयोजित एकल महिला व विधवांच्या पुनर्विवाह सोहळ्यासाठी उपायुक्त श्वेता खेळकर उद्या बुलढाण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसाई परिवाराने कॉफी विथ पुणे पोलीस उपायुक्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील कार्यरत मान्यवर , शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, पर्यावरण प्रेमी व राजकीय मंडळी यांना निमंत्रन देण्यात आले आहे.
मानस फाउंडेशनच्या माध्यमातून एकल व विधवा महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून दुर्गा उत्सव कार्यक्रमांमध्ये विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. दुर्गा उत्सव आणि विधवा विवाह सोहळा असा आगळा वेगळा व कल्पने पलिकडील योगही मानस फाउंडेशन जुळून आणलाय. याच कार्यक्रमासाठी पुणे पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर उद्या 27 सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे येत आहेत. या निमित्ताने त्यांच्याशी भेटी गाठी व संवादाचा कार्यक्रम प्राध्यापक डी.एस. लहाने यांच्या संकल्पनेत आयोजित करण्यात आला आहे. शिवशाही युनिव्हर्सल समता नगर बुलढाणा येथे सकाळी 8 वाजता कॉफी विथ पोलीस उपायुक्त कार्यक्रम होत आहे. शिवशाहीचे विद्यार्थी विविध प्रश्नांच्या माध्यमातून श्वेता खेडकर यांना बोलते करणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घेण्याचा उपक्रम शिवसाइ ने सुरू केला आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डी.एस. लहाने यांनी केले आहे.
*दुपारी विधवा विवाह सोहळा*
*नवरात्र उत्सवानिमित्त एकल महिलांचा मेळावा ,विधवा विवाह सोहळा शिवशाही युनिव्हर्सल येथे आयोजित आहे.मानस फाउंडेशनने विधवा जोडप्यांचे विवाह योग जुळून आणले आहेत.अनेक विधवा महिला प्रसंगी भावी जीवनाच्या जोडीदारासोबत रेशीमगाठ बांधणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवशाही परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वसंतराव चिंचोले आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून श्वेता ताई खेळकर व बुलढाणा एएसपी अमोल गायकवाड यांची विशेष उपस्थिती आहे.