मोताळा : (एशिया मंच न्यूज )
राजे छत्रपती कला महाविद्यालय धामणगाव बढे येथे अर्थशास्त्र विभागांतर्गत सत्र २०२५-२६ साठी अर्थशास्त्र अभ्यास मंडळाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून श्री शिवाजी महाविद्यालय मोताळा येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी.आर. चाटे हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध अभ्यासक प्रमोद टाले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अविनाश मेश्राम उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा डाॅ महादेव रिठे यांनी केले. प्रास्ताविकात प्रा रिठे यांनी अभ्यास मंडळ स्थापन करण्यामागील हेतू व पाहुण्यांचा परिचय करून दिला. उद्धाटक डॉ. चाटे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून उपस्थितांना अर्थशास्त्र सोडून जगता येत नाही, कळत न कळत अर्थशास्त्राचे सिद्धांत दैनंदिन जीवनात वापरावेच लागतात. तर प्रमुख अतिथी टाले यांनी भूतकाळातील आणि वर्तमान आधुनिक युगातील अर्थशास्त्र यात झालेला बदल याबाबत विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मेश्राम यांनी वर्तमानातील अर्थार्जन व जिवनातील आर्थिक तत्वे यावर आपले मार्गदर्शन केले.अर्थशास्त्र अभ्यासमंडळामध्ये कु. वैष्णवी गायकवाड अध्यक्ष, कु. सोनिया वल्हे उपाध्यक्ष, कु खुशी कुळे सचिव, कु. सरिता बढे सहल प्रमुख, कु. एकता जाधव सहसचिव, कु. मनवी कोठाळे प्रसिध्दी प्रमुख, हर्षल शिप्पलकर कोषाध्यक्ष, शे.एजाज सहकोषाध्यक्ष, तर सदस्य कु. अस्मिता पाचपोळ, कु. खुशी भुसारी, कु. सरिता घोती, कु. साक्षी माळोदे, अभय पिसे, गणेश सोनोने यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. सरिता बढे व आभार प्रदर्शन आदित्य चव्हाण यांनी केले.