महिला नाट्य स्पर्धेत बुलढाणा केंद्राचे 'मी मुक्त मोरणी बाई' गट स्तरावर द्वितीय
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
कामगार कल्याण मंडळाच्या वतीने फक्त महिलांसाठी अकोला येथे २९ सप्टेंबर रोजी आयोजित नाट्य महोत्सवात बुलढाणा केंद्राने सादर केलेल्या शशिकांत इंगळे लिखित व गणेश बंगाळे दिग्दर्शित 'मी मुक्त मोरणी बाई' या नाटकाने द्वितीय क्रमांक मिळवला.
अकोला, बुलढाणा व वाशीम अशा तीन जिल्ह्यांचा मिळून कामगार कल्याण मंडळाने गटस्तरीय महिला नाट्य महोत्सव आयोजित केलेला होता. यामध्ये कामगार कल्याण बुलढाणा केंद्राने मी मुक्त मोरणी बाई हे शशिकांत इंगळे लिखित व गणेश बंगाळे दिग्दर्शित नाटक सादर केले होते. विशेष म्हणजे बुलढाणाच्या नाट्यसृष्टीत पहिल्यांदाच महिलांचे स्वतंत्र नाटक निर्माण झाले. तब्बल १२ पात्रांच्या या नाट्यकृतीने अकोला येथे रसिकांची मने जिंकली व परीक्षकांनी निर्मिती, दिग्दर्शन तसेच अभिनय अशा तीनही बक्षिसांमध्ये द्वितीय क्रमांक जाहिर केला. निर्मितीसाठी कामगार कल्याण केंद्र बुलढाणा , दिग्दर्शनासाठी गणेश बंगाळे यांना तर अभिनयासाठी कल्याणी काळे यांना पारीतोषिक प्राप्त झाले.
Bbbअकोला मध्यवर्ती बँकेचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रशांत उकंडे, रॅलीज इंडियाचे उमेश गुजर, पत्रकार संजय खांडेकर, कामगार कल्याण अधिकारी वैशाली नवघरे यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले . नाटकामध्ये कलावंत म्हणून कल्याणी काळे, रुचिरा पाटील, आशा मानवतकर, प्राजक्ता कुलकर्णी , सुरेखा इंगळे, अश्विनी लोहगावकर, सविता सोनोने, पौर्णिमा साबळे, भारती बऱ्हाटे, सांची इंगळे, वैष्णवी गोरे-अहेर, निकिता मोरे यांनी सहभाग घेतला. सुषमा राणे यांनी रंगभूषा तर अंकीता नाटेकर यांनी वेशभूषा केली. शिवाणी मोरे यांनी रंगमंच व्यवस्थापन केले. संगीत गणेश राणे यांनी दिले. नाट्य संघाचे व्यवस्थापक संतोष पाटील व विलास मानवतकर हे होते.
कामगार कल्याण मंडळाच्या बुलढाणा केंद्राचे संचालक नंदकिशोर खत्री यांनी मार्गदर्शन केले. नाटकाच्या कलावंतांना रंजना बोरीकर, भक्ती लहाने , कल्पना माने, श्रुती माने, कल्पना कुलकर्णी, मोनाली ढोके व डॉ. दुर्गासिंग जाधव यांनी नाट्यानुभव सांगून मार्गदर्शन केले. नाटकासाठी अण्णासाहेब जाधव, मयुर परमार यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे सदर नाटकाला कोल्हापूर येथील ललित कला भवनात पार पडलेल्या स्पर्धेतही द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता. बुलढाण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच फक्त महिला कलावंताचे नाटक सादर होऊन पारीतोषिक मिळाल्याने नाट्यक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी संपूर्ण संघाचे अभिनंदन केले आहे.