* मुख्य कार्यकारी अधिकारी यांना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे निवेदनाद्वारे मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
मोताळा तालुक्यातील मौजे कोथळी हे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी ग्रामपंचायत म्हणून प्रीचीत आहे. येथे नवीन पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात यावा या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मौजे कोथळी व परिसरातील शेतकऱ्यांचा पशुपालन हा शेती व्यवसाया बरोबर मुख्य व्यवसाय आहे. येथे गुराढोरांची संख्या सुद्धा गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु गावामध्ये पशुवैद्यकीय दवाखान्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पशु पालकांना मोठ्या अडचणीना सामोरे जावे लागत आहे. जनावराना वेळेवर उपचार न मिळाल्याने आर्थिक नुकसान होत असून शेतकऱ्यांचे हाल होत आहे.
पशुपालकांची गरज लक्षात घेता लवकरात लवकर मौजे कोथळी येथे नवीन पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.
पुढे निवेदनात असेही नमूद आहे की, महिनाभरात यावर काही ठोस निर्णय प्रशासनाच्या वतीने केला नाही तर क्रांतिकारीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अमोल मोरे यांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी अमोल मोरे, महेंद्र जाधव, सुरेश पवार, शत्रुघन तुपकर,राजाराम जाधव, अरबाज खान, मतीन खान, अतीक शेख, असलम खान, मुजाहिद काजी, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.