* शिवसेना उबाठाचे जि. प.मुकाअ यांना निवेदन
मलकापूर : (एशिया मंच न्यूज )
मलकापूर तालुक्यामधील मोरखेड १० गाव पाणी पुरवठा योजना अंतर्गत दूषित व दुर्गंधीत पाणी पुरवठा गेल्या काही महिन्यांपासून होत असल्याने गावकर्यांवर आरोग्याचे संकट ओढल्या गेले आहे. तरी या होणाऱ्या दूषित पाणी पुरवठयाकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ लक्ष देत स्वच्छ शुद्ध पाणी मिळावे, यासाठी शिवसेना उबाठाचे मालकापूर तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील यांनी 18 जुलै रोजी निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शिवसेना उबाठा मलकापूर तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील यांना खामखेड, पि. महादेव, गौलखेड, वडजी, हरणखेड, जांबुळधाबा, दुधलगाव, लोणवडी, आळंद, तथा मोरखेड येथील गावकऱ्यांना दिलेल्या तक्रारी वरून प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर लक्षात आले की, पुरवठा झालेल्या पाण्याचा रंग तपकिरी असून त्याला दुर्गंध आहे, यामूळे सदर गावातील ग्रामस्थ खुप त्रस्त झालेले आहेत. दुर्गंधीत व दूषित पाणी पुरवठ्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पोटदुखी, कॉलरा, टायफॉईड, कावीळ सारख्या आजारांची जणू साथच या गावांमधे पसरल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या समस्येची त्वरित दखल घेऊन दूषित व दुर्गंधीत पाणी पुरवठा तत्काळ बंद करून शुद्ध पाणी पुरवठा करावा तसेच संबंधीतांवर कठोर कार्यवाहीचे आदेश द्यावेत. अन्यथा शिवसेना मलकापूर तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, आशा आशयाचे निवेदन शिवसेना उबाठा मलकापुर तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. बुलढाणा यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांना दिले.
यावेळी तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील यांच्या सह उपतालुका प्रमुख राजेंद्र काजळे, विभाग प्रमुख गणेश सुशीर, तथा स्वप्नील लोड हे हजार होते.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांना आम्ही पुरवठा झालेले पाणी एका बॉटलमध्ये दाखवले, त्यांच्या कार्यालयातील मोरीच्या नळाचे पाणी दाखवले, पवार देखील पाणी पाहून थक्क झाले. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे, कार्यकारी अभियंता यांना शुद्ध पाणी पुरवठा करून संबंधीतांवर कठोर कार्यवाही करण्याबाबत त्यांनी आश्वस्त केले आहे.
* दिपक चांभारे पाटील :