* केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतुन लासुरा येथे उभारला जाणार विशेष वैद्यकीय सेवा व मदत कक्ष !
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
संत गजानन महाराजांच्या पालखीसोबत पायी चालणाऱ्या लाखो भक्त गणांच्या आरोग्य सुविधेसाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून लासुरा फाटा येथे विशेष वैद्यकीय सेवा आणि मदत कक्ष उभारण्यात आला आहे .
पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शनासाठी गेलेली संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीचा सोहळा आटोपुन पुन्हा शेगांवच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. तब्बल 61 दिवसाचा पायी प्रवास आटपून ही पालखी 30 जुलै रोजी खामगाव नगरीमध्ये पोहणार असून पालखीचा शेवटचा मुक्काम ही खामगाव येथे होणार आहे त्यानंतर 31 जुलैच्या सकाळीच ही पालखी शेगावच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. या पालखी सोबत खामगाव ते शेगाव असा पायी प्रवास बुलढाणा जिल्ह्यातील लाखो भक्त गण करत असतात 18 किलोमीटरच्या या पायी दिंडी प्रवासामध्ये लहानांपासून तर थोरांपर्यंत श्री चे भक्तगण या शेवटच्या टप्यात पालखी प्रवासात सहभागी होतात आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा समजुन भक्तगणांच्या आरोग्य सुविधेसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून विशेष वैद्यकीय सेवा, मदत कक्ष लासुरा फाटा येथे उभारण्यात आला आहे.
या मदत कक्षात दोन रुग्णवाहिका, डॉक्टर्स, नर्सेस, यांची पुरशी संख्या, औषधीसाठा कक्षात ठेवण्यात आला आहे. पायी चालणाऱ्या श्रीच्या भक्तगणांना काही त्रास जाणवल्यास वैद्यकीय मदत कक्षाची मदत घ्या, असे आवाहन जिल्हा रुग्णालय प्रशासन, भुमीपुत्र वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करण्यात आले.