बंजारा धर्मगुरु बाबुसिंग महाराज, रामेश्वर नाईक यांचा मध्यप्रदेश दौरा* सेंधवा येथे प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा

बंजारा धर्मगुरु बाबुसिंग महाराज, रामेश्वर नाईक यांचा मध्यप्रदेश दौरा
* सेंधवा येथे प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा 
नंदुरबार : (एशिया मंच न्यूज )
       संत सेवालाल महाराज यांचे वंशज बंजारा काशी पोहरा देवी येथील गादीपती महंत आमदार डॉ. बाबुसिंगजी महाराज व मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख राज्यमंत्री दर्जा रामेश्वर नाईक हे मध्यप्रदेश दौऱ्यावर  येत असून 9 ऑगस्ट रोजी रात्री अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण यांच्या निवासस्थानी मुक्कामी थांबणार आहेत.

        10 ऑगस्ट रोजी बडवानी जिल्ह्यातील सेंधवा येथील मंडी मार्केटमध्ये सुमारे हजार ते पंधराशे प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा धर्म जागरण समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. त्या निमित्ताने धर्मगुरु बाबुसिंगजी महाराज, प.पू.गोपाल चैतन्यबापू, आरोग्यदूत रामेश्वर नाईक, प्रकाश चैतन्य महाराज, संतोष चैतन्य महाराज, बंजारा परियोजनेचे वसंतराव नाईक, सदाशिवभाऊ चव्हाण, विजयराव पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता नंदुरबार येथे संत सेवालाल महाराज यांना भोग लाऊन धुळे-नंदुरबार परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या सुमारे 25 गाड्यांच्या ताफ्याने नंदुरबार तालुक्यातील बद्रीझिरा येथील संत सेवालाल महाराज बंजारा लभाणा तांडा समृद्धी योजने अंतर्गत मंजुर असलेल्या काँक्रीट रस्त्याचे भुमिपूजन धर्मगुरु
आमदार बाबुसिगजी महाराज, रामेश्वर नाईक, माजीमंत्री आ.डॉ. विजयकुमार गावीत, संसदरत्न खासदार डॉ. हिनाताई गावीत, माजी जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रियाताई गावीत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  सकाळी 11 वाजता मध्यप्रदेश येथील सेंधवाकडे रवाना होतील. यावेळी नंदुरबार ते सेंधवा रस्त्यावर अनेक ठिकाणी धर्मगुरु व रामेश्वर नाईक यांचे स्वागत करण्यात येणार असल्याचे बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी सांगितले.

* शनिवारी नियोजन बैठक :
          कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी शनिवार 2 ऑगस्ट रोजी नंदुरबार येथील दंडपाणेश्वर मंदिरावर धुळे, नंदुरबार, जळगांव जिल्ह्याच्या अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे व संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण बंजारा तांडा समृद्धी योजनेच्या सर्व अशासकीय सदस्यांसह राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण व मध्यप्रदेशचे हुकुम पवार, संजय राठोड, हजारीलाल जाधव, रामचंद्र शेठ, मानसिंग राठोड, जालम जाधव, ईश्वर पवार, ताराचंद राठोड, समीर जाधव, दिनेश राठोड, रणजीत नायक, हिरालाल जाधव, किशोर राठोड, ताराचंद पवार, श्रावण पवार, दर्याव सिंग जाधव, भागीरथ जाधव, दिलीप राठोड, गोपाल राठोड, जुगनू पवार, प्रकाश राठोड, गोरख जाधव, संतोश जाधव, बदुलाल राठोड, काळू नायक, प्रेम सिंग राठोड, प्रल्हाद जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठकीस 11 वाजता शनिवारी दंडपाणेश्वर मंदिरावर उपस्थित राहण्याचे आवाहन तांडा समृद्धी योजनेचे जिल्हा अशासकीय सदस्य भावेश पवार, रणजीत चव्हाण, शिवाजी चव्हाण, प्रेम चव्हाण, जितेंद्र पवार, रामसिंग राठोड, युवराज चव्हाण, देवा चव्हाण, किसन पवार, वसंत चव्हाण यांनी केले आहे.