भारत सरकारच्या नोटरी पदीं ॲड.सतीशचंद्र रोठेंची नियुक्ती
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील यांची भारत सरकारच्या विधी सल्लागार, विधी न्याय मंत्रालय नई दिल्ली द्वारे महाराष्ट्र नोटरी अधिनियम 1952 च्या कलम 53 नुसार 8 जुलै 2025 रोजी पुढील पाच वर्षाकरिता नियुक्ती केली आहे.
ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील मागील चौदा वर्षापासून न्यायालयीन क्षेत्रात पीडित महिला, नागरिक, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधी तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. असंख्य गुन्हेगारांच्या तावडीतून शेतकऱ्यांची जमीन मिळवून देणे. शेतकऱ्यांना रस्ते मिळवून देणे यासह पीडित महिलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी न्यायालयीन क्षेत्रात लढलेल्या असंख्य प्रकरणांमध्ये जनसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे. यासह आझाद हिंद चळवळीच्या माध्यमातून जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा आंदोलक विधीज्ञ म्हणून अँड रोठे जिल्ह्यासह महाराष्ट्राला सुपरिचित आहे. भारत सरकारच्या नोटरी पदी त्यांची नियुक्ती झाल्याने सर्वसामान्य शेतकरी, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नियुक्तीमुळे सामाजिक न्यायालयीन तथा मित्र परिवारातून आनंद व्यक्त करत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.