बुलडाणा शहरात मोठ्या उत्सहात वसंतराव नाईक जयंती साजरी

बुलडाणा शहरात मोठ्या उत्सहात  वसंतराव नाईक जयंती साजरी 
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
        हरित क्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांची 112 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आज 1 जुलै रोजी सकाळी सर्वप्रथम वसंतराव नाईक चौकातील पुतळ्याला धर्मवीर आमदार संजय  गायकवाड यांचे सुपुत्र कुणाल गायकवाड यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी नाईक साहेबांचा जय जयकार करण्यात आला. यावेळी एकच साहेब, नाईक साहेब अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी शहरातील तसेच परिसरातील बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी महिला भगिनीची उपस्थिती होती. तदनंतर   बुलडाणा बस स्थानकावरील सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी बुलडाणा एस. टी. डेपोचे गडलिंग, मगर 
यांच्यासह आदीचीं उपस्थिती होती. 
         बुलडाणा शहरातील भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार विजय राज शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात ही  वसंतराव नाईक यांची साहेबांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.